आजच्या जगात मोबाईलचा वापर हा खूप वाढला आहे. कुठेही जातांना आपण मोबाईल सोबत घेऊन जातो. मोबाईल शिवाय जगणे जणू काही अशक्यच झाले आहे. जवळ जवळ सगळ्यांच्या मोबाईल वर व्हॉटसअप, इंस्टाग्राम, यूट्यूब हे सगळे Apps असतात. लहान मुलांन पासून तर वृद्धापर्यांत हे सगळे Apps वापरले जातात. हे सगळे Apps मनोरंजनासहित खूप काही गोष्टींना मधे कमी येतात.
तुम्हाला माहितीच असेल की आपण इंस्टाग्राम द्वारे आपण आपल्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधू शकतो. तसेच आपण नवीन लोकांशी ही जुळू शकतो. आपल मनोरंजनही होते पण आपल्याला खोटी आहे का की आपण यावरून पैसे ही कमवू शकतो?
जर तुमच्या कडे इंस्टाग्राम असेल तर हे ऐकुन तुम्हाला खूप आनंद झाला असेल. पण प्रश्न हा आहे की आपण पैसे कसे कमवू शकतो? तर याबद्दल आपण आज या लेखामध्ये जाणून घेऊयात.
- १) फोटो विक्री करून मिळवा पैसे!
- २) ब्रँड किंवा व्यवसायांसाठी प्रायोजित सामग्री पोस्ट करण्यासाठी प्रभावी म्हणून काम करणे.
- ३) स्पोन्सर्शिप वरून मिळवा पैसे!
- ४) इंस्टाग्राम अकाउंट किंवा पेज विकून पैसे कमवा!
- ५) Affiliate Marketing करून मिळवा पैसे!
- ६) स्वतःचे Products विकून पैसे कमवा!
- ७) पोस्ट मधे किंवा स्टोरी मध्ये एखाद्या Brand ला Tag करा!
- ८) आपण आपल्या वेबसाइटवर, यूट्यूब चॅनेलवर रहदारी पाठवू शकता !
- ९) विविध मार्गांनी मिळवा पैसे!
इंस्टाग्राम एक अत्यंत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगातल्या सगळ्यात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी इंस्टाग्राम हे एक आहे.
सगळ्यात जास्त इंस्टाग्रामचा वापर ही तरुण पिढी करते. या वेळी जेव्हा खूप लोकांचे काम बंद झालेत आणि ती लोकं बेरोजगार झालीत तेव्हा प्रत्येक व्यक्ती हा काहीतरी काम करून पैसे कमविण्याच्या मागे लगला आहे. की लोकं आताच Graduate झालीत पण त्यांना काम मिळालं नाही नोकरी मिळाली नाही ती लोकं नोकरी मिळवण्यासाठी फार मेहनत घेत आहे. पण जर आपल्याला सोपा आणि सरळ मार्ग हवा असेल तर हा लेख तुमच्या साठीच आहे.
इंस्टाग्राम हे 2010 मध्ये केविन स्य्स्त्रोम (Kevin Systrom) यांनी तयार केले व नंतर फेसबूकने 2012 साली $1 billon डोललेर ला विकत घेतले.
आज इंस्टाग्राम चा उपयोग सोशल मीडिया म्हणून केला जातो, आज यामध्ये 75 मिल्यन पेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. हे App प्ले स्टोर मधून मिल्यन पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे.
आपण इंस्टाग्राम वर खूप अकाऊंट बघीतली असतील त्यामध्ये लोक कंपनीचे फोटो, टिक टोक व्हिडिओ एत्यादी माहती शेअर करत आहेत व त्यांच्या फोटो आणि विडियो ला खूप लाइक आणि शेअर भेटत आहेत. असेच काही आणखी मार्ग आहेत ज्यावरून तुम्ही पैसे कमवू शकता.
मित्रांनो इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे याआधी हे जाणून घेणे महत्वाचे आहे कि त्यासाठी काय आवश्यक आहे.
- जास्त Followers असणारे पेज किंवा अकाउंट
- चांगली इंगेजमेंट
- टार्गेट औदीएन्स (Target Audience)
गेल्या काही वर्षांमध्ये, हे एका साध्या फोटो-शेअरिंग अॅपपासून शक्तिशाली मार्केटिंग टूल पर्यंत इंस्टाग्राम विकसित झाले. प्रभावकार(Influencers) आणि व्यवसाय यांना त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंस्टाग्राम प्रभावी ठरत आहे. इंस्टाग्रामने वापरकर्त्यांना जाहिरातीं द्वारे किंवा त्यांच्या किंवा कंपन्यांच्या उत्पादनांचा प्रचार करून व्यवसाय खाते तयार करुन पैसे कमविण्याची संधी दिली.
१) फोटो विक्री करून मिळवा पैसे!
आज प्र्तेकजण फोटो कलेक्शन करत आहे व हेच फोटो विकून तुम्ही पैसे कमवू शकता, त्यासाठी तुम्हाला काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करावे लागतील, यामध्ये मध्ये तुम्ही तुमची माहिती नाव, मोबाइल नंबर, अॅड करून इंस्टाग्राम वर शेअर करा, आणि नंतर लोक हा विचार करतील की तुम्ही एक चांगले फॉटोग्राफर आहात आणि ते आपल्या कंपनी ची जाहिरात करण्यासाठी ते तुमचे फोटो विकत घेतील आणि तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता.
२) ब्रँड किंवा व्यवसायांसाठी प्रायोजित सामग्री पोस्ट करण्यासाठी प्रभावी म्हणून काम करणे.
प्रभावी लोक असे आहेत ज्यांनी ऑनलाइन व्हिडिओ सामायिक करुन आपली प्रतिष्ठा निर्माण केली आणि कोट्यावधी अनुयायी आहेत.
आपल्या अनुयायांकडे आपल्या सामग्रीवर अधिक दृश्ये आणि आवडी आहेत आणि हे आपल्याला सामाजिकदृष्ट्या प्रभावी बनवेल. कंपन्या आपल्या ब्रांडची जाहिरात करण्यासाठी आपल्याकडे येतील आणि त्या बदल्यात आपल्याला पैसे देतील.
३) स्पोन्सर्शिप वरून मिळवा पैसे!
जेव्हा तुमचे Followers १० लाखाच्या वर होतात तेव्हा मोठमोठ्या कंपनी व ब्रँडस् तुमच्या अकाउंट वरून त्यांचा प्रोडक्ट प्रमोट करतात. त्यासाठी ते तुम्हाला चांगली रक्कम देतात.
४) इंस्टाग्राम अकाउंट किंवा पेज विकून पैसे कमवा!
जर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट किंवा पेज वर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स असतील आणि तुम्ही पोस्ट केलेल्या फोटो किंवा व्हिडीओ ला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेयर मिळत असतील तसेच पोस्ट मधील युसर्स एंगेजमेंट मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट, पेज विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.
इंस्टाग्राम खात्याची किंमत हि तुमच्या फॉलोवर्स वर अवलंबून असते. म्हणजेच तुमच्या इंस्टाग्राम खात्यावर जास्त प्रमाणात फॉलोवर्स असतील तर तुमचे खाते लाखो रुपयांमध्ये विकले जाऊ शकते.
५) Affiliate Marketing करून मिळवा पैसे!
तुम्ही Affiliate Marketing करण्यासाठी Flipkart आणि Amazon ह्या मोठ्या वेबसाईटचा वापर करू शकता.
यात फक्त तुम्हाला स्वतः एखाद्या प्रोडक्टचा फोटो टाकून त्याची लिंक द्यायची आहे. जेव्हा या लिंकवर क्लिक करून कोणी ते प्रोडक्ट खरेदी करेल त्याच कमिशन तुम्हाला मिळेल.
तुम्हाला मिळणार कमिशन हे % मध्ये असेल, जस कि 5%, 10% व त्यापेक्षा हि जास्त.
६) स्वतःचे Products विकून पैसे कमवा!
आपल्याला ज्या प्रकारे हे माहित आहे की तुम्हाला Affiliate Marketing मध्ये Products विकायची आहेत, त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या स्वत: च्या बनवलेल्या Products प्रचार करून देखील विक्री वाढवू शकतो.
जसे की समजा जर मी ब्लॉगिंगशी (Blogging) संबंधित content बनवित आहे, जर मला पाहिजे असेल तर मी Blogging Course तयार करुन त्यास इंस्टाग्रामवर प्रमोट करू शकतो किंवा आणि विकू शकतो.इंस्टाग्रामवर अशी पद्धत वापरणारे बरेच लोक आहेत जे खूप चांगले पैसे कमवत आहेत.
७) पोस्ट मधे किंवा स्टोरी मध्ये एखाद्या Brand ला Tag करा!
जेव्हा आपण अशी Post किंवा Story ठेवतो आणि त्यामध्ये कोणत्याही Brandचा उल्लेख केला असल्यास किंवा त्याचा फोटो दिसत असेल तर त्या Story मध्ये किंवा Post मध्ये त्या Brand च्या पेजला Tag करा.
अशा प्रकारे, त्या Brand ला आपल्या पेजबद्दल माहिती मिळते आणि त्यांच्याकडून आपल्याला Sponsorship मिळण्याची शक्यता असते.
आणि यासह, Reach देखील वाढते ज्यामुळे आमच्या Instagram Page वरील संख्या देखील वाढते.
हे पूर्ण वाचण्यापूर्वी, या पोस्ट पहा:
८) आपण आपल्या वेबसाइटवर, यूट्यूब चॅनेलवर रहदारी पाठवू शकता !
इंस्टाग्राम फक्त गोंडस फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याबद्दल नाही. हे नेटवर्किंगसाठी विशेषतः क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांसाठी एक अद्भुत व्यासपीठ बनले आहे.
आज, ई-कॉमर्स ब्रँड्ससाठी इन्स्टाग्राम एक मजबूत विक्री जनरेटर बनला आहे.लोक प्रत्यक्षात उत्पादने शोधण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी इन्स्टाग्राम वापरत आहेत.
आपण आपल्या वेबसाइट ची लिंक देऊन त्यावर रहदारी पाठवू शकता. सोबतच YouTube चॅनेल ची देखील इन्स्टाग्राम वर जाहिरात करू शकता. येथे यशाची खरी गुरुकिल्ली आहे ती Followers करता नेहमी विश्वासार्ह राहणे.
९) विविध मार्गांनी मिळवा पैसे!
इंस्टाग्राम खाते तयार करण्यापूर्वी, कोणत्या विशिष्ट क्षेत्रात आपण जाऊ शकता हे जाणून घ्या.
जिथे आपण जास्तीत जास्त ब्रँड मिळवू शकता आणि त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करुन आपण पैसे कमवू शकता.
हा आपला छंद किंवा आवड असू शकतो जसे – पाककला , प्रवासी सल्ला, योग सूचना, छायाचित्रकार, चित्रकार इ.
जेव्हा आपण एखादे इंस्टाग्राम अकाउंट तयार करता तेव्हा आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत –
आपल्या खात्यासाठी एक चांगले नाव निवडा.
त्याच्याशी संबंधित नावानुसार एक चित्र अपलोड करा.
आपण काय करीत आहात आणि आपल्या चॅनेलचा हेतू काय आहे याची बायो मध्ये उचित माहिती द्या.
आपण त्यासह काही इमोजी देखील वापरू शकता.
तर मित्रांनो! ही होती इंस्टाग्राम वरून पैसे कमवायचे विविध मार्ग व Ideas. यामध्ये आपण इंस्टाग्राम बद्दल खूप गोष्टी जाणून घेतल्या ज्यावरून तुमचे प्रश्न व शंका दूर झाल्या असतील.