महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: 288 जागांचा जिल्हानुसार तपशील
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे, कारण २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार मोहीम राबवत आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण किती जागा?

महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. या जागा जिल्ह्यानुसार कशा विभागल्या आहेत, याची सविस्तर यादी खाली दिली आहे.
अहमदनगर जिल्हा: 12 जागा
अहमदनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 12 जागा आहेत:
- अकोले
- कर्जत-जामखेड
- कोपरगाव
- नेवासा
- पारनेर
- राहुरी
- संगमनेर
- शेवगाव
- शिर्डी
- श्रीगोंदा
- श्रीरामपूर (SC)
- अहमदनगर शहर
संभाजीनगर जिल्हा: 9 जागा
संभाजीनगर जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत:
- संभाजीनगर मध्य
- संभाजीनगर पश्चिम
- संभाजीनगर पूर्व
- गंगापूर
- कन्नड
- पैठण
- फुलंब्री
- सिल्लोड
- वैजापूर
बुलढाणा जिल्हा: 7 जागा
बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा जागा:
- बुलढाणा
- चिखली
- जळगाव (जामोद)
- खामगाव
- मलकापूर
- मेहकर (SC)
- सिंदखेडराजा
गडचिरोली जिल्हा: 3 जागा
गडचिरोलीत आदिवासींना प्राधान्य देणाऱ्या 3 विधानसभा जागा आहेत:
- अहेरी (ST)
- आरमोरी (ST)
- गडचिरोली (ST)
जळगाव जिल्हा: 11 जागा
जळगाव जिल्ह्यात विधानसभेसाठी 11 मतदारसंघ आहेत:
- अमळनेर
- भुसावळ (SC)
- चाळीसगाव
- चोपडा (ST)
- एरंडोल
- जळगाव शहर
- जळगाव ग्रामीण
- जामनेर
- मुक्ताईनगर
- पाचोरा
- रावेर
लातूर जिल्हा: 6 जागा
लातूर जिल्ह्यातील विधानसभा जागा:
- औसा
- लातूर शहर
- लातूर ग्रामीण
- निलंगा
- उदगीर
नागपूर जिल्हा: 12 जागा
नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत:
- हिंगणा
- कामठी
- काटोल
- नागपूर दक्षिण-पश्चिम
- नागपूर दक्षिण
- नागपूर पूर्व
- नागपूर मध्य
- नागपूर पश्चिम
- नागपूर उत्तर
- रामटेक
- सावनेर
- उमरेड
नाशिक जिल्हा: 15 जागा
नाशिकमध्ये विधानसभेच्या 15 जागा आहेत:
- बागलान (ST)
- चांदवड
- देवळाली
- दिंडोरी
- इगतपुरी
- कळवण
- मालेगाव मध्य
- मालेगाव बाह्य
- मांडगाव
- नाशिक पूर्व
- नाशिक मध्यम
- नाशिक पश्चिम
- निफाड
- सिन्नर
- येवला
परभणी जिल्हा: 4 जागा
परभणी जिल्ह्यात विधानसभेच्या 4 जागा आहेत:
- गंगाखेड
- जिंतूर
- परभणी
- पाथरी
रत्नागिरी जिल्हा: 5 जागा
रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा:
- चिपळूण
- दापोली
- गुहागर
- राजापूर
- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा: 3 जागा
सिंधुदुर्गमध्ये विधानसभेच्या 3 जागा आहेत:
- कणकवली
- कुडाळ
- सावंतवाडी
वर्धा जिल्हा: 4 जागा
वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ:
- आर्वी
- देवळी
- हिंगणगाठ
- वर्धा
अकोला जिल्हा: 5 जागा
अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या 5 जागा आहेत:
- अकोला पश्चिम
- अकोला पूर्व
- अकोट
- बाळापूर
- मूर्तिजापूर (SC)
बीड जिल्हा: 6 जागा
बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या 6 जागा:
- आष्टी
- बीड
- गेवराई
- केज
- माजलगाव
- परळी
चंद्रपूर जिल्हा: 6 जागा
चंद्रपूरमध्ये विधानसभेच्या 6 जागा आहेत:
- बल्लारपूर
- ब्रह्मपुरी
- चंद्रपूर
- चिमूर
- राजुरा
- वरोरा
गोंदिया जिल्हा: 4 जागा
गोंदिया जिल्ह्यात विधानसभेच्या 4 जागा:
- आमगाव
- अर्जुनी मोरगाव
- गोंदिया
- तिरोरा
जालना जिल्हा: 5 जागा
जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ:
- बदनापूर
- भोकरदन
- घनसावंगी
- जालना
- परतूर
मुंबई शहर: 10 जागा
मुंबई शहरातील विधानसभेच्या 10 जागा:
- भायखळा
- कुलाबा
- धारावी (SC)
- माहीम
- मलबार हिल
- मुंबादेवी
- शिवडी
- सायन कोळीवाडा
- वडाळा
- वरळी
मुंबई उपनगर: 26 जागा
मुंबई उपनगरात विधानसभेच्या 26 जागा आहेत:
- अंधेरी पश्चिम
- अंधेरी पूर्व
- अणुशक्तीनगर
- भांडुप पश्चिम
- बोरिवली
- चांदिवली
- चारकोप
- चेंबूर
- दहिसर
- दिंडोशी
- घाटकोपर पश्चिम
- घाटकोपर पूर्व
- गोरेगाव
- जोगेश्वरी पूर्व
- कालिना
- कांदिवली पूर्व
- कुर्ला
- मागाठणे
- मालाड पश्चिम
- मानखुर्द शिवाजीनगर
- मुलुंड
- वांद्रे पूर्व
- वांद्रे पश्चिम
- वर्सोवा
- विक्रोळी
- विलेपार्ले
नांदेड जिल्हा: 9 जागा
नांदेड जिल्ह्यात विधानसभेच्या 9 जागा आहेत:
- भोकर
- देगलूर
- हदगाव
- किनवट
- लोहा
- मुखेड
- नायगाव
- नांदेड उत्तर
- नांदेड दक्षिण
ठाणे जिल्हा: 18 जागा
ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या 18 जागा आहेत:
- ऐरोली
- अंबरनाथ
- बेलापूर
- भिवंडी पश्चिम
- भिवंडी पूर्व
- भिवंडी ग्रामीण
- डोंबिवली
- कल्याण पश्चिम
- कल्याण पूर्व
- कल्याण ग्रामीण
- कोपरी-पाचपाखाडी
- मिरा-भाईंदर
- मुंब्रा-कळवा
- मुरबाड
- ओवळा-माजिवडा
विधानसभा निवडणुकीचे महत्त्व विधानसभा निवडणुका राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेवर येईल, कोणाचे वर्चस्व टिकेल, आणि जनतेच्या समस्या कोण सोडवेल, हे निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असते. प्रत्येक विधानसभा जागेचा आपल्या भागातील विकासावर आणि धोरणांवर थेट परिणाम होतो.
राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी निवडणुका जाहीर होताच, महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, उमेदवारांची घोषणा लवकरच होईल. प्रत्येक पक्षाला आपल्या भागातील मतदारसंघात जिंकण्यासाठी योग्य उमेदवार निवडणे आवश्यक आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये काही मोठ्या नावांची चर्चा आहे, तर काही नवे चेहरेही रिंगणात उतरतील.
सध्याचे राजकीय वातावरण राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली चालू आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन प्रमुख गट एकमेकांविरुद्ध आघाडीवर आहेत. या निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी आणि नव्या सरकारची उभारणी करण्यासाठी दोन्ही पक्षांत जोरदार सामना होणार आहे.
मतदानाची तयारी निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर करताच, राज्यभरात विविध स्तरांवर तयारी सुरू झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलांनीही आपली योजना आखली आहे.
निवडणुकीचा निकाल मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल. तेव्हा कळेल, कोणता पक्ष बाजी मारेल आणि कोणाला सत्ता गमवावी लागेल. जनता कोणाचा विश्वास जिंकेल, आणि राज्याच्या भावी विकासाचं चित्र काय असेल, हे त्या दिवशीच स्पष्ट होईल.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात काय घडेल, कोणते नवे चेहरे उदयास येतील, कोणते पक्ष विजय साजरा करतील, हे येणारा काळच सांगेल.