You are currently viewing ११ मार्ग घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

११ मार्ग घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?


आजच्या जगात पैसेही काळाची खूप मोठी गरज झाली आहे. पैसे कमविन्यासाठी आपण खूप धडपड करतो. कारण पैस्यांशिवाय जगणे अता अशक्यच झालं आहे.

घरून बाहेर पडताना आपण सगळ्यात आधी पैसे सोबत घेतो कारण पैस्यांशिवाय बाहेर पडणे आता शक्य राहिलेलं नाही. विचार करा, जीवनातली येवढी महत्वाची गोष्ट जर आपल्याला घर बसून मिळाली तर?

जर आपल्याला घर बसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे आले तर?

पण खरच असा होता का? हे शक्य आहे का? तर याच उत्तर आहे हो! हे शक्य आहे.
तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पैसे मिळवू शकता.


जमाना इंटरनेटचा आहे. याच इंटरनेटद्वारे तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करु शकता. घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून अशी काही कामं आहेत जी केल्यास तुम्हाला तासाभरात 1000 रुपये कमवता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला काही वेळ देण्याची आवश्यकता आहे.

घर बसल्या पैसे कमावणे काही फार कठीण नही बस तुमच्या मध्ये काही ना काही तरी कौशल्य असणे गरजेचे आहे. जस कि तुम्हाला कॉम्पुटर बद्दल महिती असणे हे प्रामुख्याने गरजेचे आहे.

आपण आपला बिझनेस सुरू करून ही पैसे कमवू शकतो. पण त्यामध्येही आपल्याला फार मेहनत घ्यावी लगते आणि विविध ठीकणी जाऊन आपल्याला अपल काम पूरअसेल तर मग यातून ही तुम्ही पैसे कमवू शकता!
ऑनलाईन अश्या खूप वेबसाइट्स आहेत.

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे

1. यूट्यूब वरून पैसे कमवू शकता?

११ मार्ग घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

यूट्यूब एक असे साधन आहे ज्यावर आपल्याला मनोरंजन सहित विविध गोष्टींबद्दल माहिती मिळते. विविध लोकं आपल्या आवडीला किंवा आपल्यातील कलेला युटब्रच्या माध्यमातून विविध लोकांपर्यंत पोहवू शकतो.

जर लोकांना तुमचे व्हिडिओ आवडले तर तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळू शकते व तुम्ही पैसे देखील कमवू शकता. मज्जा करता करता पैसे कमविण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

2. ऑनलाईन ट्युशन घेऊन मिळवा पैसे

११ मार्ग घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

मित्रांनो! जर आपल्याला आसे वाटत असेल की आपल्यामध्ये एक उत्तम गुरु म्हणजेच टीचर दडलेला आहे तर ऑनलाईन ट्युशन घेऊन तुम्ही पैसे कमवू शकता.

ऑनलाईन अश्या खूप वेबसाइट्स आहे ज्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता आणि टीचर बनू शकता.तुम्ही मोबाईल फोन किंवा लॅपटॉप व कॉम्प्युटर द्वारे ऑनलाईन टीचींग चे काम करू शकता.

3. ब्लॉगिंग करून मिळवा पैसे

जर आपल्याला ब्लॉगींग करायला आवडत असेल व ब्लॉगींग करणं आपल्याला जमत असेल तर मग यातून ही तुम्ही पैसे कमवू शकता!

११ मार्ग घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

ऑनलाईन अश्या खूप वेबसाइट्स आहेत ज्यावर आपण मोफत ब्लॉगींग करू शकता. आपण ब्लॉग वर आपले विचार मांडू शकता. जर तुमचे ब्लॉग लोकांना आवडले तर तुमचा ब्लॉग लोकप्रिय ठरतो व यातून तुम्हाला पैसे कमवता येतात.

4. चित्रकलेतून घरबसल्या कमवा पैसे

चित्रकलेच्या माध्यमातून आपण पैसे कमवू शकता. जर चित्रकला ही आपली आवड आहे तर तुम्ही चित्रकला करून पैसे कमवू शकता.

 चित्रकलेतून घरबसल्या कमवा पैसे

आपल्याला अवगत असलेल्या कला आपल्याला घरबसल्या पैसे कमवून देऊ शकतात. तुमच्या चित्रकलेची गरज आहे त्या वेबसाइट्सना ज्या ऑनलाईन चित्रे विकत घेतात जसे की www.mojarto.com. जर त्यांना तुमची चित्रे आवडली तर तुम्ही या क्षेत्रात फार पुढे जाऊ शकता.

5. तुमची लिहण्याची आवड तुम्हाला मिळवून देऊ शकते पैसे

तुमची लिहण्याची आवड तुम्हाला मिळवून देऊ शकते पैसे

जर तुम्ही एक उत्तम लेखक किंवा लेखिका असाल तर तुमची ही कला तुम्हाला घरबसल्या चांगली रक्कम मिळवून देऊ शकते. तुम्ही तुमची एक बुक लिहून त्याला विकू शकता किंवा तुमचे आर्टिकल म्हणजेच लेख ब्लॉग वर पब्लिश करू शकता.

जर तुमचे लेख लोकांना आवडले तर तुम्हाला चंगली रक्कम मिळू शकते.

6. फोटोग्राफी तुमची आवड असेल तर पैसे कमवायला तयार व्हा!

फोटोग्राफी तुमची आवड असेल तर पैसे कमवायला तयार व्हा!

फोटोग्राफी जर तुमचा पॅशन असेल, जर तुमची आवड असेल तर तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता. आपण काढलेले फोटोज् विकून आपण पैसे कमवू शकता.तुम्ही तुमच्या फोटोज् ना ऑनलाईन वेबसाइट्स वर विकून पैसे कमवू शकता. काही वेबईट्स जसे की Shutterstock, Photosheller आणि Getty Images.

7. सर्वे करून कमवा पैसे

सर्वे करून कमवा पैसे

तुम्हाला ऐकून आशचर्य होईल की फक्त आपल मत देऊनही आपण घरबसल्या पैसे कमवू शकता. जरी हे स्वप्नासारख वाटत असल तरीही हे खरं आहे. तुम्ही Survey Junkie, Swagbook सरख्या वेबसाइट्स वर जाऊन विविध गोष्टींवर आपलं मत नोंदवून तुम्ही पैसे कमवू शकता. हा एक सोपा मार्ग आहे पैसे जमविण्याचा. घरबसल्या आरामात तुम्ही पैसे कमवू शकता.

8. सोशल मीडयाद्वारे पैसे कसे कमवायचे?

तुमचे जर फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया साईट्स वर खाते असेल तर तुम्ही पैसे कमवू शकता.

सोशल मीडयाद्वारे पैसे कसे कमवायचे

तुम्हाला एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्ट्स म्हणेजच वस्तू आपल्या सोशल मीडिया वर पोस्ट आणि स्टोरी टाकून प्रोमोटे करायच्या आहे.

त्यामुळे त्यांच्या वस्तू बद्दल विविध लोकांना कळेल व त्यांची वस्तू विकली जाईल. त्यातून तुम्हाला ती कंपनी कमिशन म्हणून पैसे देईल.

9. फेसबुक द्वारे पैसे कसे कमवायचे?

फेसबुक मधे टाईमपाससोबतच तुम्ही घरबसल्या कमाईही करू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? यासाठी तुम्हाला सर्वप्रथम फेसबुकवर एक पेज तयार करावं लागेल. त्यानंतर हे पेज तुम्हाला वेळोवेळी अपडेटही ठेवावं लागणार आहे. जेवढी तुमची पोहच वाढेल तेवढे जास्त कमाई तुम्ही करू शकाल.

 फेसबुक द्वारे पैसे कसे कमवायचे

आपल्या बिझनेसची मार्केटिंग करण्याचा हा एक उत्तम पर्यायही आहे. यासाठी तुम्हाला फेसबुकचा ‘अॅडव्हान्स युझर’ बनावं लागेल. यासाठी फेसबुककडून तुम्हाला एक इन्व्हिटेशन मिळेल.

तुमच्या फेसबुक पेजचा वापर जास्त असेल तर तुमच्या पेजला जाहिराती मिळणं सुरू होईल… आणि यातूनच तुम्ही कमाई करू शकाल.

10. Power Point Presentation डिझायनर

Power Point Presentation आजच्या Digital युगातील सादरीकरणातील महत्त्वपूर्ण घटक आहे. बऱ्याच कंपन्यांना  Professional पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवून हवे असतात. तुम्हाला जर Computer चे मूलभूत ज्ञान असेल व तुम्ही प्रोफेशनल Powerpoint Presentation बनवू शकत असाल, तर तुम्ही PPT तयार करून पैसे कमवू शकता.

Power Point Presentation

यासाठी कोणतीही विशेष अशी Educational qualifications लागत नाही. प्रोफेशनल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन डिझायनर होण्यासाठी English भाषेवर प्रभुत्व गरजेचे आहे. तसेच MS Office चे ओरिजिनल genuine व्हर्जन असणे गरजेचे आहे. Crack केलेले व्हर्जन वापरण्यास परवानगी नाही.

या क्षेत्रात ‘Knowmore’ हा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्मस् पैकी एक आहे. त्या प्लॅटफॉर्म वर ऑनलाईन अर्ज करून तुम्हाला तीन चाचणी परीक्षा द्यावा लागतात. तुम्ही त्या परीक्षा पास झाला की तुमची प्रोफेशनल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन डिझायनर म्हणून निवड होते.

त्या platform वर टिकून राहण्यासाठी आठवड्यात किमान 10 तास काम करणे गरजेचे आहे. त्याबद्दल तुम्ही इंटरनेटवरून अधिक माहिती घेऊ शकता.ऑनलाइन क्लासेसनाही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करून हवी असते.

जर तुम्हाला Education क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर अशा ऑनलाइन क्लासेसना त्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवून देऊ शकता. त्याच्याशी संबंधित Advertisement विविध क्लासेसच्या वेबसाईट वर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. तुम्ही त्या जाहीरीतींच्या संदर्भाने ऑनलाइन अर्ज करू शकता.

११)  डेटा एन्ट्री ऑपरेटर

आजकाल जवळजवळ सर्वच कंपन्याचा त्यांचे कामकाज डिजीटल करण्याकडे कल वाढला आहे. तसेच लहान मोठ्या व्यापाऱ्यानी त्यांचा हिशोब व Biling हे Computer वर करण्यास सुरूवात केलेली आहे. त्यामुळे या क्षेत्रात दिवसेंदिवस अधिकाधिक संधी उपलब्ध होत आहेत.

डेटा एन्ट्री ऑपरेटर

Text किंवा Image Format मधील माहिती एखाद्या विशिष्ट Software मध्ये एकत्र करण्याच्या प्रक्रियेस ‘Data Entry’ असे म्हणतात. डेटा एंट्रीमध्ये एक्सेल डेटा एंट्री, Spelling Checker, पेपर डाक्युमेंटेशन, जॉब पोस्टिंग, Data Conversion इत्यादी प्रकारांचा समावेश होतो.

डेटा एंट्री ऑपरेटर बनण्यासाठी इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान व Typing Speed चे कौशल्य असणे आवश्यक आहे. तसेच या कामासाठी संगणकाचे मूलभूत ज्ञान वम MS Office विशेषत: MS Word व MS Excel वापरता येणे गरजेचे आहे. हे काम घरबसल्या करूनही तुम्ही पैसे कमवू शकता.

गृहिणी, विद्यार्थी असल्यास अथवा अन्य ठिकाणी जॉब करत असल्यास तुम्ही हे काम पार्ट टाईम जॉब म्हणून करू शकता. फुल टाईम डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून करीअर करायचे असल्यासही या क्षेत्रात चांगला स्कोप आहे. 

घरबसल्या पैसे कमवने जरी सोपं असेल तरीही आपण खबरदारी घेणं ही अत्यंत आवश्यक आहे. कुठली वेबसाईट खरी आहे व कुठली खोटी हे देशील बघणे आवश्यक आहे. म्हणून घरबसल्या पैसे कमवतांना बेजबाबदारपणे वागू नये. कुठलीही वेबसाईट जर तुम्हाला पैसे मागत असेल तर तुम्ही सावध व्हा. कुठल्याही फसवणुकीला बळी पळू नका.

तर ही होती घरबसल्या पैसे कमविण्याची साधने. यतील कुठलेही पर्याय आपण निवडून त्यातून पैसे कमवू शकता. तर मग वाट कसली बघत आहात? आताच या साधनांचा उपयोग करून घरबसल्या पैसे कामविण्याच्या संधीच सोनं करा!

Leave a Reply