SEO म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमाइजेशन (Search Engine Optimization)
उदाहरणार्थ, आपल्याला भोपळा विषयी सर्च करायचं असेल तर आपण लगेच Google, Firefox, Google Chrome अशा सर्च इंजिन वर भोपळा टाईप करुन माहिती मिळवतो. सर्चवर क्लिक केल्यावर आपल्याला त्या भोपळ्याच्या माहितीच्या बऱ्याच वेबसाइट्स मिळतात.
पण कधी विचार केला आहे का, कि या वेबसाइट्स कशा? व का? आल्या असतील, किंवा ती सगळयात वरची वेबसाइट वरती कशी आली, तर बाबांनो याचे मुख्य कारण म्हणजे SEO होय.
वेबसाईट कितीही सुंदर आणि चांगली असेल तरी त्यासाठी SEO करण्याची गरज असते, कारण त्याशिवाय ती आपोआप गुगल अथवा इतर प्लॅटफॉर्म्स वर दिसणार नाही.
प्रामुख्याने जे लोक अफिलिएट मार्केटिंग किंवा गूगल ऍडसेन्स चा वापर करतात त्यांना वेबसाईट वर जास्त लोकांना आणावे लागते, जेवढे जास्त लोक साईट ला भेट देतील तेवढे जास्त पैसे कमावण्याची संधी त्यांना असते. या मध्ये SEO, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल माध्यमांचा वापर केला जातो.
SEO म्हणजे काय?
बिझनेस वाढवायला वेबसाईट चालू केली त्यासाठी डोमेन, होस्टिंग तर विकत घेतले. पण सर्च केल्यावर तुमची वेबसाईट रँक होतच नसेल, म्हणजेच सर्च केल्यावर तुमची वेबसाइट सर्वांत वरती नसेल तर त्यामुळे तुमच्या वेबसाइट वर येणाऱ्या लोकांची संख्याही कमी होईल. त्यामुळे तुमच्या वेबसाइटची मार्केटिंग कमी प्रमाणात होईल, तुमचा लेख कमी लोकांपर्यंत पोहोचेल, त्यामुळे येणारे इन्कम हि कमी येईल. या सगळया गोष्टी होऊ नयेत म्हणून SEO काय आहे, कसे काम करते, काय करावे लागते हे माहीत असले पाहिजे.
सोप्या भाषेत SEO म्हणजे आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगला सर्च इंजिनमध्ये रँक करण्याची प्रक्रिया होय.
SEO चा उपयोग करून आपण आपल्या वेबसाईटला सर्च इंजिन मध्ये रँक करू शकतो. तसेच आपल्या वेबसाईटचा SEO चांगल्या प्रकारे केला तर मोठ्या प्रमाणात नवीन ट्रॅफिक मिळवू शकतो.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे महत्वाचे घटक
ऑन पेज एस.ई.ओ. (On Page SEO)
ऑफ पेज एस.ई.ओ. (Off Page SEO)
टेकनिकल एस.ई.ओ. (Technical SEO)
१) ऑन पेज SEO म्हणजे काय? (On Page SEO)
ऑन पेज SEO म्हणजे “ऑन साईट ऑप्टिमायझेशन” होय. आपल्या वेबसाईट वर किंवा वेब पेजेस वर रँकिंग मिळवण्यासाठी ज्या काही Activities केल्या जातात त्याला ऑन-साईट SEO किंवा ऑन पेज SEO म्हंटले जाते. ऑन पेज म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टी पेज वर दिसतात. जसे टायटल, प्रतिमा (Image), परिच्छेद, किवर्ड, लिंक इत्यादी. या सर्वांची व्यवस्थितपणे मांडणी केली तर सर्वात वर रँक होता येईल.
पुढीलप्रमाणे काही ऑन-साइट SEO चे महत्वाचे घटक आहेत :
टायटल टॅग (Title Tag)
शिर्षक टॅग हा ऑन पेज एस.ई.ओ. चा महत्वाचा घटक आहे. प्रत्येक पेज आणि पोस्टला Unique व आकर्षित करणारे टायटल असावं आणि त्यामध्ये मुख्य कीवर्डचा उल्लेख केलेला असावा. जेणेकरून ते वाचकांना आकर्षित करू शकेल. यामुळे आपला CTR (Click Through Rate) देखील वाढ होईल.
मेटा डिस्क्रिपशन (Meta Description)
वेबसाईटच्या प्रत्येक पेजवर टायटल व डिस्क्रिपशन (Description) असावं यामुळे गुगलच्या क्रॉलर्सला त्या पेजचा हेतू समजण्यास मदत होईल.
मेटा डिस्क्रिपशन हे साधे व सोप्या शब्दांमध्ये असायला हवे, वाचकांनी ते मेटा डिस्क्रिपशन वाचल्यानंतर त्यांना आपल्या ब्लॉगमध्ये काय लिहिले आहे याची कल्पना आली पाहिजे, आणि वाचक आपला ब्लॉग वाचण्यासाठी उत्सुक झाला पाहिजे.