You are currently viewing डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? Digital Marketing Mhnje Kay?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? Digital Marketing Mhnje Kay?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? आजकाल जवळ जवळ सर्वाकडेच मोबाईल आणि त्यात इंटरनेट आहे. आपले अंबानी साहेब म्हणजेच Jio ने ते उपलब्ध करुन दिले आहे.

आजच्या युगात सर्व काही ऑनलाईन आणि सर्व काही इंटरनेट वर उपलब्ध झाले आहे.आणि त्यामूळेच आपले जीवन खूप सोयीस्कर झाले आहे.

Online Shopping, Ticket Booking, Recharges, Bill Payments, Online Transactions, Chatting, Job searching इत्यादी बऱ्याच गोष्टी आपण इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत. आणि आता या इंटरनेटच्या ट्रेंडमुळे व्यवसायात देखील डिजिटल मार्केटिंगचा वाटा खूप मोलाचा ठरला आहे.

जवळ जवळ 70-85% लोकं कोणतीही वस्तू किंवा सेवा घेण्याआधी ऑनलाइन संशोधन करतात.त्या वस्तूची किंमत बघतात,माहिती काढतात,कुठे स्वस्त दरात आहे ते पाहतात, कुठे चांगली service मिळेल ते आधी बघतात, कंपनी कोणती आहे त्याची माहिती काढतात. अशा परिस्थितीत कोणत्याही कंपनी किंवा व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग महत्वाचे होते.

मराठीत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, डिजिटल मार्केटींग म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे एक साधन,ग्राहकांना आपल्या ब्रँड कडे आकर्षित करण्याचे साधन, आपल्या ब्रँड चे नाव वाढवून जास्तीत जास्त विक्री करण्याचे साधन

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे? (Importance of Digital Marketing)

आजचे युग हे इंटरनेट युग आहे, आणि डिजिटल मार्केटिंग इंटरनेटद्वारे कार्य करण्यास सक्षम आहे.

जवळ जवळ प्रत्येक माणूस हा इंटरनेटशी कनेक्ट झालेला आहे, तो सर्वत्र ते सहजपणे वापरू शकतो. जर आपण एखाद्याला भेटायला सांगितले तर ते म्हणतील की माझ्याकडे वेळ नाही, परंतु सोशल साइटवर, त्यांना आपल्याशी बोलण्यास काहीच हरकत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता या युगात डिजिटल मार्केटींग वापर करणे प्रत्येक उद्योजकाला महत्त्वाचे आहे.

डिजिटल मार्केटिंग काय काम करते?

लोकं त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या आवडत्या आणि आवश्यक वस्तू इंटरनेटद्वारे सहज मिळवू शकतात. आता लोक मार्केटमध्ये जाणे टाळतात, आणि आता तर आपल्या भावाने म्हणजे कोरोनाने तर बाहेर जाणं अजूनच अवघड करुन ठेवलंय.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

आजकाल भाजी पासून ते आवडत्या खेळण्या पर्यंत ते टीव्ही रिमोट पर्यंत सगळ्या गोष्टी Online च मिळतायत.

Digital Marketing हे व्यवसायाला त्याच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांचा लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते.याद्वारे ग्राहक वस्तूंचा आनंद घेण्यासाठी बाजारपेठेत म्हणजेच इंटरनेट विश्वातील मार्केट मध्ये येतात. आणि त्यांचा बाहेर येण्यास आणि जाण्यासाठी लागणारा वेळ वाचतो. व्यापाऱ्यालाही व्यापारात मदत मिळत आहे. तो अल्पावधीतच अधिकाधिक लोकांशी संपर्क साधू शकतो आणि ग्राहकांना आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये सांगू शकतो.

सध्याच्या काळात डिजिटल मार्केटिंगची मागणी (Future of Digital Marketing)

पूर्वीच्या काळी आणि काही प्रमाणात आताही आपलं प्रोडक्ट विकण्यासाठी लोकं दारोदार जायची.लोकांच्या घरच्या दाराची बेल वाजवायची,त्यांना माहिती सांगायची, त्यांना आपलं प्रोडक्ट किती चांगल आहे हे Convince करायची. आणि नंतर जाहिरात हा प्रकार आला. टीव्ही वर, रेडिओ,रस्त्यावरील बॅनर्स…. इत्यादी वर जाहिरात केली जाते.

पण आता काळ बदलला आहे.आणि बदल हा जीवनाचा नियम आहे. सर्व वर्णांचे लोक आज इंटरनेटशी कनेक्ट आहेत, या सर्वांमुळे सर्व लोकांना एकाच ठिकाणी एकत्रित करणे सोपे आहे, जे पहिल्यांदा शक्य नव्हते.

इंटरनेटद्वारे उद्योजक आणि ग्राहकांचे कनेक्शन देखील स्थापित होऊ शकते. सध्याच्या काळात डिजिटल मार्केटींगमूळे आपला माल तयार करणारा व्यापारी सहजपणे ग्राहकाकडे जात आहे. यामुळे डिजिटल व्यवसायाला चालना मिळतेय.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

प्रत्येक व्यक्ती गूगल, फेसबुक, यूट्यूब इत्यादी वापरत आहे, ज्याद्वारे व्यापारी आपले उत्पादन ग्राहकास दाखवते. हा व्यापार सर्वांच्या आवाक्यामध्ये आहे – व्यापारी आणि ग्राहक देखील.

Digital Marketing कमी वेळात एकाच वस्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शवून ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट्स कडे आकर्षित करुन घेते.लोकांचा विश्वासही डिजिटल मार्केटकडे वाटचाल करत आहे. हिंदी मध्ये म्हण आहे ना, “जो दिखता हैं वही बिकता हैं

डिजिटल मार्केटिंगचे किती प्रकार आहेत?

१) सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)

हे एक तांत्रिक माध्यम आहे जे आपली वेबसाइट शोध इंजिन निकालांच्या शीर्षस्थानी ठेवते जे Visitors ची संख्या वाढवते. यासाठी योग्य Keywords आणि SEO मार्गदर्शक सूचनांनुसार आम्हाला आमची वेबसाइट बनवावी लागेल. आजच्या तारखेला आपल्याला काही सर्च करायचे असेल तर जवजवळ ९०-९५% लोकं Google ओपन करता व त्यासंबंधी सर्च करतात. जसे आपल्याला नवीन मोबाईल घ्यायचा असेल किंवा कंप्यूटर तर आपण गुगल वर सर्च करतो.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

जी वेबसाइट Google च्या सर्च रिजल्ट वर सर्वात वर येते त्याला आपली वेबसाइट आणि त्यातून आपल्या व्यापार ची माहिती मिळते. आपल्याला आपल्या व्यवसायात जास्तीत जास्त लीड पाहिजे असतील तर आपल्याला गुगल च्या लिस्ट मध्ये वर राहिले पाहिजे.

त्यासाठी आपल्याला आपली वेबसाइट Google ने दिलेल्या SEO च्या गाइडलाइन प्रमाणे बनवली पाहिजे ही पद्धत आपल्याला Google च्या सर्च रिजल्ट मध्ये वर येण्यासाठी उपयोगात येते.

२) सर्च इंजिन मार्केटिंग (Search Media Marketing)

सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे वेबसाइट ची दृश्यता नैसर्गिक किंवा paid मार्केटिंगच्या माध्यमातून वाढवणे. सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये SEO सुद्धा ग्राह्य धरले जाते म्हणजेच SEM = SEO + Paid Advertisement होय.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

Google, Bing यासारख्या सर्च इंजिनवर पेड मार्केटिंग करून Website वर जास्तीत जास्त सेल करण्यासाठी वापरले जाते.

३) सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)

सोशल मीडिया वर बिजनेस फक्त आपले  प्रोडक्ट आणि सर्विसेस ला प्रमोट करू शकतो तर तो त्याहीपलीकडे हे पण जाणू शकतो की  ग्राहक आपल्या ब्रॅण्ड बद्दल काय बोलत आहेत.कस्टमर्स आजकाल जे प्रोडक्ट विकत घेतात जे कपड़े घालतात त्याबद्दल सोशल मिडीयावर चर्चा करतात .

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

याव्यतिरिक्त Instagram, Facebook, Twitter सारखी अन्य सोशल मीडिया साइट्स वर ही या ब्रँड्स ची आणि त्यांच्या प्रोडक्शन ची चर्चा होत असते. आपण या चर्चा मध्ये सामील होऊन आपल्या कस्टमर सोबत संबंध अजुन मजबूत करू शकतो.आणि नवीन ग्राहक हि जोडू शकतो.

४) ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)

या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्स/ब्रँड ची माहिती डायरेक्ट ग्राहकाला त्याच्या इमेल वरती मेल करून देऊ शकता. नवीन प्रॉडक्ट ची माहित,त्या वर मिळणारी सूट, किंवा काही मोफत फायदा या गोष्टी साठी तुम्ही ई-मेल मार्केटिंग चा असे करू शकता.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

बाजार मध्ये काही ई-मेल मार्केटिंग ची मोफत टूल्स उपलब्ध आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता. उदा.,सेंड इन ब्लू, मेल चिंप, गेट रिस्पॉन्स.

५) YouTube चॅनेल

सोशल मीडिया हे एक माध्यम आहे ज्यात उत्पादकांना त्यांची उत्पादने थेट लोकांपर्यंत पोहोचवावी लागतात. यावर लोक आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त करू शकतात.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

हे असे माध्यम आहे जिथे बऱ्याच लोकांची गर्दी असते किंवा म्हणा की मोठ्या संख्येने वापरकर्ते / दर्शक YouTube वर राहतात. व्हिडिओ बनवून आपले उत्पादन लोकांसाठी दृश्यमान करण्याचा हा एक सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे.

६) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

वेबसाइट्स, ब्लॉग्ज किंवा लिंक्सद्वारे जाहिरात उत्पादनांनी मिळवलेले मोबदला एफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात. या अंतर्गत, आपण आपला दुवा तयार करा आणि त्या दुव्यावर आपले उत्पादन ठेवले.

जेव्हा एखादा ग्राहक तो दुवा दाबून आपले उत्पादन खरेदी करतो, तेव्हा आपण त्यावर कठोर परिश्रम करतो.

अफिलिएट मार्केटिंग

अफिलीयट मार्केटिंग मधून सामान्य व्यक्ती सुद्धा वस्तूंची जाहिरात करून वस्तू विकू शकते आणि त्या बदल्यात कंपनी त्यास ५-१५% पर्यंत कमिशन देते. भारतात Trivago, Amazon, Flipkart, Godaddy, Hostinger, कूपनराजा या कंपनी अफिलीयट मार्केटिंग साठी मोठ्या प्रमाणात ओळखल्या जातात.

७) पे पर क्लिक (Pay Per Click Marketing)

आपल्याला ज्या जाहिराती पहाव्या लागतील त्यास पे पर क्लिक जाहिराती म्हणतात. त्याच्या नावावरून हे माहित आहे की त्यावर क्लिक करून पैसे कपात केले जातात. हे प्रत्येक प्रकारच्या जाहिरातींसाठी आहे या जाहिराती सतत येत राहतात. जर कोणाला या जाहिराती दिसल्या तर पैशांची कपात केली जाते. हा डिजिटल मार्केटींगचा एक प्रकार आहे.

८). अँप्स मार्केटिंग (Apps Marketing)

लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यावरील उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी इंटरनेटवर वेगवेगळे अँप्स बनविणे याला अँप्स मार्केटिंग म्हणतात. हा डिजिटल विपणनाचा उत्तम मार्ग आहे. आजकाल बरेच लोक स्मार्ट फोन वापरत आहेत. मोठ्या कंपन्या त्यांचे अँप्स बनवतात आणि लोकांसाठी अँप्स उपलब्ध करतात.

९). डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)

डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing) म्हणजे आपल्या व्यवसायाची सर्च इंजिन वरती जाहिरात करणे . (Google, Yahoo, Bing) हि सर्च इंजिन आहेत . या वरती आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकतो . हि सर्च इंजिन त्यांच्या जाहिरात पार्टनर सोबत या जाहिराती दाखवण्याचे काम करत असतात .

डिस्प्ले मार्केटिंग

उदा : आपण लोकमत पेपर च्या वेबसाईट वरती एखादी बातमी वाचत असताना आपणास मध्ये मध्ये जाहिरात दिसत राहते त्यालाच डिस्प्ले मार्केटिंग म्हणतात. 

१०) कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing)

कंटेन्ट मार्केटिंग म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या संदर्भातील माहिती लिखित स्वरूपात पोहचवणे. उदा. ब्लॉग , व्हिडीओ क्लिप, वेबिनार , ऍनिमेटेड व्हिडीओ , इ–बुक.

12) व्हिडिओ मार्केटिंग (Video Marketing)

या मध्ये तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्स ची माहिती विडिओ चित्रफितीच्या माध्यमातून लोकं पर्यंत पोहचवून  जागृती करून त्याची विक्री वाढवू शकता. व्हिडिओ मार्केटिंगसाठी युट्युब हे लोकप्रिय ठिकाण आहे त्याच बरोबर फेसबुक, इंस्टाग्राम , स्नॅपचॅट येथे देखील विडिओ ऍड चालवल्या जातात.

१3) मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing)

या इंटरनेट च्या दुनिये मध्ये आज स्मार्ट फोन वापर कर्त्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्या मुळे या लोकांना SMS, Whats App Messages यांच्या माध्यमातूम आपण आपल्या प्रॉडक्ट्स चे मार्केटिंग शकतो . येणाऱ्या काळात स्मार्ट फोन वापरकर्त्याच्या  संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंगचे फायदे

१) कमी खर्चिक (Low Cost): डिजिटल मार्केटिंग हे पारंपारिक मार्केटिंग पद्धतीपेक्षा खूपच कमी खर्चिक आहे.

२) जास्त परतावा (High ROI): ROI (Return Of Investment) म्हणजे आपण मार्केटिंग वर केलेल्या खर्चाच्या मानाने आपल्याला त्यातून किती फायदा झाला आणि डिजिटल मार्केटिंग हे कमी खर्चिक असल्यामुळे मार्केटिंग वर केलेल्या खर्चाच्या मानाने आपल्याला नक्कीच जास्त फायदा होतो.

३) हाताळणे सोपे व कमी खर्चिक (Low Operational Cost): आपल्याला माहितीच आहे की पारंपारिक मार्केटिंग पद्धतीमध्ये जसे की पाम्प्लेट वाटणे, पेपर मध्ये जाहिरात देणे, बोर्ड लावणे यांसारख्या कामांमध्ये जास्त मनुष्यबळ व खर्चाची गरज भासते पण डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण फक्त लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर च्या सहाय्याने काम करू शकतो त्यामुळे त्याचा हाताळणी खर्च कमी होतो.

४) सोईचे आणि सोपे (Convenience and Easy): पारंपरिक मार्केटिंग पद्धतीमध्ये मोठ्या व्यावसायिक व छोट्या व्यावसायिकांमध्ये भेदभाव केला जाईल उदाहरणार्थ जर कोणाला वर्तमानपत्रांमधील मुखपृष्ठावर जाहिरात द्यायची असेल तर ती फक्त कोणालातरी एकालाच भेटू शकते जे की फक्त मोठ्या कंपनींना परवडू शकेल किंवा शहरातील मुख्य ठिकाणी गोड लावणी हे छोट्या व्यावसायिकांना परवडू शकत नाही पण डिजिटल मार्केटिंग हे जाहिरातदारांमध्ये अशी कोणतीही भेदभाव करत नाही. डिजिटल मार्केटिंग मध्ये सर्वांना एकच प्लॅटफॉर्म दिला जातो जो की इंटरनेट. त्यामुळे छोट्या जाहिरातदारांनाही आपल्या प्रोडक्टची जाहिरात करता येते.

५) परिणामांचे विश्लेषण (Result Analyzing): डिजिटल मार्केटिंग चा हा सर्वात प्रमुख फायदा आहे जो की आपल्याला पारंपारिक मार्केटिंग पद्धतीत भेटत नाही. डिजिटल मार्केटिंग मध्ये ज्यावेळी आपण जाहिरात करतो त्यावेळी आपल्यालाही पाहता येतील किती जाहिरात किती लोकांनी पाहिली, कोणत्या भागातील लोकांनी पाहिली, किती वयोगटातील लोकांनी पाहिले, आपल्या कोणत्या जाहिरातीतून जास्त परिणाम भेटत आहे असे बरेच काही विश्लेषण आपल्याला त्यामुळे पाहता येते.

६) वेळेची बचत आणि कमी मेहनत (Time and Effort Saving): डिजिटल मार्केटिंग करत असताना वेळ आणि मेहनत या दोन्हीची बचत होते.

 ७) लवचिकता (Flexibility): डिजिटल मार्केटिंग हे अतिशय flexible आहे.आपल्या वेळेनुसार चालू किंवा बंद करू शकतो .

 ८) झटपट अभिप्राय (Instant Feedback): या मधून आपण ग्राहकांचा झटपट अभिप्राय घेऊ शकतो किंवा तो आपणास मिळत राहतो .

९) परिणामकारक (Impactful): हे माध्यम पारंपरिक मार्केटिंग पेक्षा अतिशय परीणामकारक आहे . कारण डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून आपण नेमके आपणास हव्या असणाऱ्या ग्राहक पर्यंत पोहचू शकतो . (वय,लिंग,ठिकाण आपण निवडू शकतो ).

१०) वास्तविक वेळ विश्लेषण(Real Time Analysis): या मध्ये आपण सध्य स्थिति मध्ये काय सुरु आहे आणि आपले मार्केटिंग कसे सुरु आहे ते पाहू शकतो व त्या नुसार पुढील रननीती ठरवू शकतो .

Leave a Reply