You are currently viewing यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे? How to Make Money From YouTube

यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे? How to Make Money From YouTube

तुम्हाला माहिती आहे का यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे? यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खासियत काय आहे, तर हे माध्यम आपल्याला आपल्यातल्या कलागुणांना जगासमोर ठेवून प्रसिद्धी मिळवण्याची संधी तर देतेच पण त्यातून पैसा कसा कमवायचा याचाही मार्ग दाखवते.

आपण बघतोच की कितीतरी सामान्य लोक ज्यांच्याकडे इतर संसाधनांचे कमी असतानाही फक्त त्यांच्यातील टॅलेंटचा आणि स्क्वेअर चा वापर करून लाखो लोकांपर्यंत पोहोचून त्यातून भरपूर पैसा कमावत आहे. विशेषतः काहीतरी वेगळे करून स्वतःची एक वेगळी इमेज तयार करण्यासाठी धडपडणारे युवकांसाठी हे माध्यम एक सुवर्णसंधीच म्हणायचे.

यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे? यूट्यूब विषयी थोडेसे: 

या माध्यमाचा उपयोग करून लोक लाखो रुपये कसे कमी होतात हे बघण्या अगोदर आपण हे माध्यम काय आहे ते समजून घेऊया.

युट्युब (YouTube) ची स्थापना स्टीव्ह चेन, चाड हर्ली आणि जावेद करीम यांनी केली होती. हे एक Google च्या मालकीचे ऑनलाइन व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. याचे वापरकर्ते दररोज एक अब्ज तासापेक्षा अधिक YouTube व्हिडिओ पाहतात आणि शेकडो तासांचे व्हिडिओ कंटेंट प्रत्येक मिनिटाला YouTube सर्व्हरवर अपलोड केले जाते.

यावरून आपण अंदाज बांधू शकतो की याचे जाळे जगभर किती मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे व याचे वापरकर्ते व आपल्या रोजच्या जीवनातला किती जास्त वेळ युट्युब वापरताना दिसतात.

2005 साली स्थापन झालेले हे माध्यम सध्या YouTube Premium, YouTube Music, YouTube TV, YouTube Kids अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्टची सेवा देते आणि गेल्यावर्षीची याची आर्थिक उलाढाल ही 19.8 बिल्लियन यु.एस. डॉलर एवढी होती. यावरून आपल्याला याची प्रचंडता लक्षात येईल.

यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे

युट्यूबवरील व्हिडिओंची कॅटेगरी अमर्याद आहे कारण वापरकर्त्यांना संगीत व्हिडिओ, व्हिडिओ क्लिप, छोटे आणि माहितीपट चित्रपट (डॉक्युमेंट्री), ऑडिओ रेकॉर्डिंग, कॉर्पोरेट प्रायोजित चित्रपटाचे ट्रेलर, थेट प्रवाह (लाईव्ह व्हिडिओ), व्हिडिओ ब्लॉग्ज तसेच लोकप्रिय यूट्यूबर्समधील कंटेंट आढळू शकते.

आजही बरेचसे कंटेंट हे वैयक्तिकरित्या तुमच्या आमच्या सारखी लोकं तयार करतात, ज्यात प्रॉडक्ट प्रमोट करणाऱ्या कंपन्या त्यांच्या जाहिराती देतात. याचा अर्थ असा होतो की युट्युब हे आपल्याला प्रत्यक्ष पैसे देत नाही परंतु ते जाहिरातदार आणि युट्युब चे वापरकर्ते यांच्यातील दुवा म्हणून काम करते.

युट्यूबर कसे बनावे?

येथे लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट ती अशी की युट्युब चे वापरकर्ते हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे कंझ्युमर आणि दुसरे म्हणजे प्रोड्युसर.

कंझ्युमर हे फक्त युट्युब वरील व्हिडिओज बांधण्याचे काम करतात तर प्रोड्युसर  युट्यूब वरच्याच विविध व्हिडिओच्या मदतीने स्वतःचे नवीन व्हिडिओ प्रोड्युस म्हणजे तयार करण्याचे काम करतात व यांनाच युट्युबर असे म्हटले जाते.

यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे

थोडक्यात ही अशी एक साखळी आहे जिथे याचे वापरकर्तेच रोज नवीन व्हिडिओ कंटेंट उपलोड करून कंझ्युमर पर्यंत पोहोचण्याचे काम करत असतात व त्यातून पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी मिळवत असतात.

तुमचेही कोणी फेवरेट युट्युब सेलेब्रिटी असतील ज्यांना बघून तुम्हाला असे वाटते की आपण हे खरंच असंच काहीतरी करावं आणि आपल्याला ते जमूही शकतं, हो तुम्ही ते बरोबर वाचत नाही तुम्ही ही एक युट्युब वर होऊ शकता त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज असते त्या कोण कोणत्या ते बघूया.

चला तर मग तुम्ही तयार आहात ना एक सक्सेसफुल युट्यूबर बनण्यासाठी…

युट्यूबर बनण्यासाठीच्या स्टेप्स: 

1) विषय निवडणे: 

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आवडीचा एखादा विषय निवडावा लागतो त्यास शास्त्रीय भाषेत नीच सलेक्शन असे म्हणतात. थोडक्यात काय तर तुम्हाला तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट शोधावा लागतो ज्यावर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकता.

यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे

हे निवडताना त्या विषयाबद्दल आपली असलेली आवड, याविषयी असलेली सखोल माहिती, आपले या विषयातील ज्ञान, आणि त्यासोबतच निवडलेला विषय किती चालू शकतो म्हणजेच या विषयाचे व्हिडिओ चुकलो का खरच बघतील का यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. बरेचजण शक्यतो असाच विषय निवडतात जो त्यांचा अगोदरपासूनच छंद आहे.

उदाहरणार्थ जर तुम्हाला फिरायला खूपच आवडत असेल तर तुम्ही ट्रॅव्हलिंग वरचे यूट्यूब चैनल चालू करून विविध ठिकाणच्या माहितीपर व्हिडिओजचे चॅनेल तयार करू शकता व तुमच्या सारखेच घुमण्या फिरण्याची आवड असलेले ऑडियन्स तुमचे व्हिडिओज नियमितपणे खूप आवडीने बघतील, म्हणून रांडॉम्ली कोणत्याही गोष्टींवर व्हिडिओज बनवत असताना एखादा स्पेसिफिक टॉपिक घेऊन त्यावरच व्हिडिओज बनवून अपलोड केले तर ते आपल्याला फिक्स्क ऑडियन्स देते व फायदेशीर ठरते.

2) आपल्या विषयासंबंधी थोडासा रिसर्च: 

एकदा का आपला विषय निवडून झाला की आपल्याला दुसरे महत्त्वाचे काम असते ते म्हणजे आपल्या विषयावर काम करत असलेल्या इतर चॅनल्सचा किंवा युट्युबर चा शोध घेणे आणि त्यांनीचे कन्टेन्ट काळजीपूर्वक तपासणी जेणेकरून आपल्याला दोन्ही गोष्टी कधीही त्या म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याने त्यांची व्हिडीओ जास्तीत जास्त चालतात त्यासोबतच त्यांच्या कंटेंट मध्ये राहून गेले आल्या शोधून त्या आपल्या व्हिडिओज मध्ये कशा आणता येईल जेणेकरून आपल्याला आपली वेगळी ओळख तयार करून ते टिकूनही ठेवता येईल.

याव्यतरिक्त या व्हिडीओज खाली आलेल्या कॉमेंट्स महत्त्वाच्या असतात कारण याद्वारे तुम्हाला तुम्हाला कळते की ऑडियन्स ला व्हिडिओज मधल्या नेमक्या कोणत्या गोष्टी जास्त आवडल्या व अजून कोणत्या तुमची कमतरता आहे. 

3) टेक्निकल गोष्टींचा अभ्यास:

आता आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टींची माहिती करून घेणे जे आपण युट्युब वर न चांगल्या प्रकारे करू शकतो. या स्टेपला तुम्हाला हे जाणून घ्यायची आहे की आपले स्वतःचे चैनल तयार करण्यासाठी नेमके काय काय पाहिजे.

तरी यासाठी तुम्हाला स्वतःचे एक जीमेल अकाउंट पाहिजे, या तुम्ही लॉग इन करून युट्युब प्लॅटफॉर्म उघडता तेव्हा तुम्हाला युवर चैनल (Your Channel) म्हणून एक पर्याय दिसतो, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अपलोड व्हिडिओज म्हणून आणखी एक पर्याय ओपन होतो.

यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे

त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव असलेले व्हिडीओ अपलोड करू शकता. आणि अशा रीतीने तुमचा पहिला व्हिडिओ अपलोड होतो.

हो, तुमचं चैनल तयार करून व्हिडिओ अपलोड करणं हे इतकं सोपं आहे. फनी आहे पुढे तुम्हाला अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागतो त्या म्हणजे तुमच्या जाणला तुमच्या विषयानुरुप एक चांगले सोपे आणि इंटरेस्टिंग नाव देणे, व्हिडिओच्या प्रकारानुसार प्लेलिस्ट तयार करणे, इ.

3) चॅनल मोनेटाइज करून जाहिराती मिळवणे

चॅनल मोनेटाइज करून जाहिराती मिळवणे

अपलोड केलेले व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक , इंस्टाग्राम, किंवा व्हाट्सअप इ. ठिकाणी आपले कंटेंट शेअर करून, एका वर्षाच्या आत आपले सबस्क्रायबर एक हजारांपेक्षा अधिक कसे होतील याकडे लक्ष देणे.

आपल्या अपलोड केलेल्या व्हिडिओज टोटल घेऊन वाच टाईम (व्हिडिओ बघितल्याचा वेळ) हा 4000 तासांपेक्षा अधिक कसा बनवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे असते कारण त्याशिवाय आपले चॅनलच मोनेटाईज होत नाही जो की आपला जाहिराती मिळवुन पैसे कमावण्याचा मार्ग आहे. 

यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे असेल तर लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्वाच्या टीप्स

1) नियमितता:

एक सक्सेसफुल युट्युबर बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचे क्वालिटी लागते ती म्हणजे नियमितता. असं नाही की तुम्ही यूट्यूब चैनल चालू केल्या बरोबरच लगेच तुम्हाला रिव्हर्स मिळतील आणि जाहिराती मिळायला सुरुवात होईल, तर त्यासाठी गरजेचे असते ती म्हणजे नियमितता.

म्हणजे आपल्याला सतत काही ठराविक कालावधीनंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओज अपलोड करत राहावे लागतात जेणेकरून आपला सध्याचा ऑडियन्स तर खिळून राहिला परंतु त्यासोबतच आणखी नवीन ऑडियन्सची त्यात भर पडत राहील व आपले चैनल लवकर मोनेटाइज होऊन त्यावर जाहिराती मिळायला सुरुवात होईल.

2) अपडेट राहणे: 

आपल्या विषयात नेहमी अपडेट राहणे व आपल्या ऑडियन्सला सतत फ्रेश कंटेंट देत राहणे गरजेचे असतो आणि हीच क्वालिटी तुम्हाला इतर लाखो युट्यूबर्स पासून वेगळी ओळख देऊ शकते. युट्युब वर वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट असलेले एवढे सगळे व्हिडिओज उपलब्ध असताना ऑडियन्सने तुमचेच व्हिडिओ का बघावे याचे उत्तर हे नेहमी अपडेट राहणे यात आहे. 

3) इंटरेस्टिंग कंटेंट: 

आपले व्हिडिओ सतत कसे जास्तीत जास्त इंटरेस्टिंग बनतील याकडे यासाठी लक्ष द्यावे लागते की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचून आणता येतो व तो कायमस्वरूपी आपला ही बनवता येतो. तुमचा व्हिडिओ जितका इंटरेस्टिंग तितके व्हीअर्स जास्त. कारण सिम्पल आहे, कुणालाही बोरिंग व्हिडिओ आवडत नाही.

Leave a Reply