मंगलकार्य किंवा कोणत्याही शुभ कामाला सुरुवात करताना, त्याच्या पथावर प्रवष्याच्या कामाच्या विघ्नोंना हरवण्यासाठी, श्रीगणपतीची पूजा आणि आराधना करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आपल्या किंवदंत्याच्या अजूनही चालू आहे.
श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी, प्रतिष्ठापना कसे करावी, हे…
गणपतीची स्थापना करण्यासाठी, एक चौरंग किंवा पाट आणि सभोवतीच्या मखराची आवश्यकता आहे.
पूजास्थानाच्या वर बांधण्यासाठी नारळ, आंब्यांचे डहाळी, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्याचा पट्टा, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, आणि प्रसादसाठी मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ हे सर्व आवश्यक आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी, प्रात:स्नानसंध्या पूजादी नित्यविधी करावेत.
मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात.
नंतर त्यावर मूर्ती स्थापना करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून, द्विराचमन आणि प्राणायाम केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं.
कलश, शंख, घंटा आणि दीप यांना गंधअक्षता-पुष्पांसह अर्पण करावं. नंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा आणि मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेच्या पुढील मंत्र म्हणावेत.
अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।। १ ।।
रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।
पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।
बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।
देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।। २ ।।
अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्रीगणेशांना नमस्कार करून…
एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।
पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।। 3 ।।
ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।
चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।। 4 ।।
दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।
मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।। 5 ।।
हे श्लोक म्हणत असताना अंत:करणात श्रीगणेश मूर्तीचे ध्यान करावे.
आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।। ६ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।
असे म्हणून मूर्तीला आवाहन सूचक अक्षता अर्पण कराव्यात.
विचित्र रत्नरचितम् दिव्यास्तरण संयुतम्।
स्वर्णसिंहासनम् चारु गृहाण सुरपूजित।। ७ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षताम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात.
सर्वतीर्थ समानीतम् पाद्यम् गंधादि संयुतम्।
विघ्नराज गृहाणेदम् भगवन् भक्तवत्सल।। ८ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पादयो: पाद्यम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेशांच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.
अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।
गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।। ९ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।
असे म्हणून पळीभर पाण्यात गंध , अक्षता , पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने , अर्घ्य म्हणून श्रीगणेशांना अर्पण करावे.
विनायकम् नमस्तुभ्यम् त्रिदशैरभि वंदित।
गंगाहृतेन तोयेन शीघ्रम आचमनम् कुरु।। १० ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आचमनियम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेशांच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे.
गंगादि सर्वतीथेर्भ्य आनीतम् तोयमुत्तम्।
भक्त्या समपिर्तम् तुभ्यम् स्नानाय आभीष्टदायक।। ११ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। स्नानम् समर्पयामि।।
असं म्हणून श्रीगणेशांवर फुलाने पाणी अर्पण करावं.
पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।
पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।। १२ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेशांना फुलाने पंचामृत अर्पण करावे. नंतर पाणी अर्पण करावे. या वेळी सुगंधी अत्तर , गरम पाणी अर्पण करावे. अथर्वशीर्ष म्हणावे
रक्तवस्त्रयुगम् देव दिव्यम् कांचनसंभवम्।
सर्वप्रदम् गृहाणेदम् लंबोदर हरात्मज।। १३ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। वस्त्रम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेशांना वस्त्र अर्पण करावे.
राजतम् ब्रह्मासूत्रम् च कांचनम् चोत्तरीयकम्।
गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानाम् वरदो भव।। १४ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।
जानवे श्रीगणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे.
कस्तुरीरोचना चंदकुंकुमैश्च समन्वितम्।
विलेपनम् सुरश्रेष्ठ चंदनम् प्रतिगृह्यताम्।। १५ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। चंदनम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेशांच्या मस्तकाला चंदन लावावे.
रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन।
ललाटपटले चंदस्तस्योपरि विधार्यताम्।। १६ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। अक्षताम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेशांना अक्षता अर्पण कराव्यात.
माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो।
मयाहृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्।। १७ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।
असे म्हणून अनेक प्रकारची फुले , दुर्वा , शमी व अन्य पत्री श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.
दशांगम् गुग्गुलम् धूपम् सुगंधम् च मनोहरम्।
गृहाण सर्वदेवेश उमापुत्रम् नमोस्तुते।। १८ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।
असे म्हणून डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावे.
सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापह।
गृहाण मंगलम् दीपम् रुद्रप्रिय नमोस्तुते।। १९ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।
असं म्हणून निरांजनाने श्रीगणेशांना ओवाळावं.
नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।
ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।। २० ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।
असं म्हणून श्रीगणेशांना नैवेद्य दाखवावा.
पूगीफलम् महदिव्यम् नागवल्ल्या समन्वितम्।
कर्पुरइला समायुक्तम्तांबुलम् प्रतिगृह्यताम्।। २१ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पूगीफल तांबुलम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेशांना विडा अर्पण करावा.
गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।
एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन।। २२ ।।
विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।
कुमारगुरवे नित्यम् पूजनीया: प्रयत्नत:।। २३ ।।
हे मंत्र म्हणून २१ दुर्वा श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.
नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे।
साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।। २४ ।।
असा मंत्र म्हणून श्रीगणेशांसमोर साष्टांग नमस्कार घालावा.
यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।
तानि तानि विनश्यन्तिम् प्रदक्षिण पदे पदे।। २५ ।।
असा मंत्र म्हणून स्वत:भोवती ३ प्रदक्षिणा घालाव्या
विनायकेशपुत्र त्वम् गणराज सुरोत्तम।
देहि मे सकलान् कामान् वंदे सिद्धिविनायक।। २६ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। मंत्रपुष्पम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेशांना फुले अर्पण करावी व हात जोडून पुढील प्रार्थना करावी…
यन्मया चरितम् देव व्रतमेतत् सुदुर्लभम्।
गणेश त्वम् प्रसन्न: सन् सफलम् कुरु सर्वदा।। २७ ।।
विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत।
पार्वतीप्रि य विघ्नेश मम विघ्नान् निवारय।। २८ ।।
आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।
पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।। २९ ।।
मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तितहीनम् सुरेश्वर।
यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।। ३० ।।
अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।
तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।। ३१ ।।
अशी श्रीगणेशांची प्रार्थना झाल्यावर आरती करावी. त्यानंतर मंत्रपुष्पांजली अर्पण करावी.
।। इति पूजाविधी ।।