You are currently viewing मिलिंद देवड़ा यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिंदेसेनेत प्रवेश.

मिलिंद देवड़ा यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिंदेसेनेत प्रवेश.

माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवड़ा 2004 मध्ये संसद दाखल झाले राहुल गांधी यांच्यानंतर तरुण काँग्रेस खासदार म्हणून मिलिंद देवड़ा यांची ओळख आहे.

काँग्रेसचा दावा आहे की मिलिंद देवड़ा यांनी काँग्रेस मधून बाहेर पडणे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश करणे हे सुरू झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेपासून लक्ष हटवण्यासाठी आखलेला डाव आहे.

काँग्रेस पक्षाचे संपर्कप्रमुख जयराम रमेश आणि इंडियन एक्सप्रेसला सांगितले, मिलिंद देवड़ा यांना मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जाण्याची भीती होती त्यामुळे त्यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदे प्रवेश केला. या मतदारसंघाची जागा शिवसेनेला देण्यात आल्यामुळे मिलिंद देवड़ा यांनी हा निर्णय घेतल्या असल्याचे कळते.

55 वर्षांपासून देवड़ा कुटुंब काँग्रेस सोबत आहे. मिलिंद देवड़ा यांचे वडील मुरली देवड़ा ही काँग्रेसचे नेते होते.

मिलिंद देवड़ा

मिलिंद देवड़ा यांची इच्छा होती की दक्षिण मुंबई मतदार संघासाठी राहुल गांधींनी मध्यस्थी करावी तसेच शुक्रवारी जय राम रमेश यांच्याशी सुद्धा बोलले होते.

दक्षिण मुंबई हा मतदार संघ बहुदा मुस्लिम लोकसंख्या आहे शिवाय कॉस्मोपॉलिटीन लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे.

शिंदे सेनेत जाऊनही हा मतदार संघ मिलिंद देवड़ा ना मिळेल याची शक्यता कमी आहे. भाजपने दक्षिण मुंबईवरील आपला दावा अजून सोडलेला नाही या मतदारसंघात भाजपचे सध्याचे सभापती राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा अशी नावे भाजपने पुढे केली आहे.

मिलिंद देवड़ा यांनी संरक्षण, नागरी विमान वाहतूक, अंदाज, शहरी विकास आणि माहिती तंत्रज्ञान वरील संसदीय समित्यांमध्ये विविध पदावर काम केले आहे. तसेच त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि जहाज बांधणी राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.

मिलिंद देवड़ा हे एक दूरदर्शी व्यवसाय अनुकूल आणि कॉस्मोपोलिटीन नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे.

मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांनी मिलिंद देवड़ा यांना या निर्णयावर पुन्हा विचार करण्याचे आवाहन केले आहे असे असले तरी मिलिंद शिंदे सैनिक प्रवेश केल्यामुळे त्यांचे मन बदलणे शक्य नाही.

मिलिंद देवड़ा यांच्यासोबत किमान दहाहून अधिक माजी नगरसेवक आणि दक्षिण मुंबईतील नेते शिंदे सेनेत गेले आहेत.

मिलिंद देवड़ा यांनी त्यांच्या समर्थक आणि मतदारांसाठी सोशल मीडियावर एक पत्र लिहिले आहे.

काय म्हटले आहेत मिलिंद देवड़ा यामध्ये?

मिलिंद देवड़ा

मिलिंद देवड़ा यांनी या पत्रात काँग्रेसला सोडते का दिली आणि शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला हे जाणून घेण्याचा अधिकार तुम्हा सर्वांना आहे आणि म्हणूनच ही माझी भूमिका तुम्हा सर्व समोर मांडत आहे.

2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वर्ष लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर मी काही धाडसी सुधारणां करण्याची सूचना केली होती. 2019 मध्ये मतदानाच्या फक्त एक महिना आधी माझी नेमणूक झाली असूनही निवडणुकीतील पराभवाचे संपूर्ण दायित्व स्वीकारलं आणि माझ्या पदाचा राजीनामा दिला.

2019 मध्ये झालेल्या महाविकास आघाडी स्थापनेला सुद्धा माझा विरोध होता. कारण महा विकास आघाडीच्या युतीच्या स्थापनेमुळे काँग्रेसवर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता होती.
त्यावेळी मी काँग्रेसच्या विचारधारेपेक्षा वैयक्तिक फायद्याला प्राधान्य दिले त्यामुळे असे काही पाऊल मी उचलले नाही.

मला काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सातत्याने बाजूला सारले गेले. असे असले तरी काँग्रेस आणि गांधी घराण्याची माझे कुटुंबाचे असलेले नाते कायम राखण्यासाठी माझी पक्षाची बांधिलकी कायम ठेवली.

दुःखाची बाब म्हणजे मी 2004 मध्ये ज्या पक्षात प्रवेश केला होता त्या काँग्रेस पक्षाची मूळ स्थिती आता बदललेली आहे. आणि त्यांच्या विचारसरणीतही मोठा बदल झाला आहे. चा खेद मिलिंद देवड़ा यांनी व्यक्त केला.

आणखी हे वाचा:

कोण आहेत वसंत मोरे? वसंत तात्या मोरे इतके फेमस का आहेत?

मराठा आरक्षणासंदर्भात पुढची दिशा जाहीर? मनोज जरांगेंची पत्रकार परिषद

बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, गजानन तौर यांची गोळीबार करुन हत्या

मोदींचा 2024 पराभव झाल्यास शेअर बाजार कोसळणार, गुंतवणूकदार बुडणार?

Leave a Reply