You are currently viewing मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी 2024 ला निघणार अंतरवाली सराटी ते मुंबई पायी दिंडी

मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी 2024 ला निघणार अंतरवाली सराटी ते मुंबई पायी दिंडी

अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी सकाळी नऊ वाजता मुंबईसाठी निघणार. 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन कानी या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. 

आता ही शेवटची लढाई आहे आता जर आरक्षण मिळाले नाही, तर आपल्या पोरांचे प्रचंड हाल होणार. 

आपण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत येणार नाही असेही म्हणत जरांगे पाटील म्हणाले.

अंतरवाली सराटीतून पुढे शहागड, गेवराई, पाडळशी, मांदळमोरी, तांदळा, मातूरी, पाथर्डी, तिसगाव, करंजी, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी, बायपास, चंदन नगर, शिवाजीनगर, पुणे, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वे वरून लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदान व दादरमधील शिवाजी पार्कवर दाखल होतील.

या दिंडीसाठी वेगवेगळ्या तुकड्या केल्या जाणार आहेत ज्या गावातून दिंडी जाणार तिथे लोकांनी एकत्र येऊन तेथून पुढे एकत्र प्रवास सुरू करावा तसेच गावातील लोकांनी मुंबईला जाणाऱ्या लोकांना रस्त्यात लागणाऱ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी.

गावकऱ्यांनी सर्वांना एकत्र करून जेवढी होईल तेवढी मदत करावी असे म्हणत जरांगे पाटलांनी आव्हान केले आहे.

मुंबईला जाण्यासाठी ज्या वेगवेगळ्या तुकड्या केल्या जाणार आहेत त्या तुकड्यातील लोकांनी आपापले जेवणाची सोय करावी.

तुमच्यासोबत जे वाहन घेणार आहे त्याला घरासारखे बनवून त्याचा वापर करावा. आपापल्या तुकडीवर लक्ष ठेवावे व व कोणी समाजकंटक फिरत नाही ना त्यावर लक्ष द्यावे व दिंडीत व्यसन करू नये व कोणी करत असेल त्यावर लक्ष ठेवावे असेही जरांगे पाटील म्हणाले.

या दिंडीमध्ये गरीब मराठे, शेतकरी मराठे व श्रीमंत मराठे यांनी सर्वांनी सामील व्हावे. 

कोण कोणते सामान सोबत घ्यावे.

अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ सोबत घ्यावे टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध पावडर सर्व सोबत घेऊन चला. ऊसतोड करायला चाललो समजून सर्व संसार सोबत घेऊन चला असे म्हणत जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आणखी हे वाचा:

मराठा आणि कुणबी यांच्यात फरक काय असतो ? ९६ कुळी, सप्तकुळी, पंचकुळी मराठे नेमके कोण असतात ?

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत?

मनोज जरांगे नावाची सरकारला धडकी? ट्रॅक्टर चालकांना पाटवल्या नोटीशी? २४ डिसेम्बरला मराठे मुंबईत धडकणार?

Leave a Reply