राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण लवकरात लवकर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असल्याचं जाहीर केलं.
मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत काेणतीही कालमर्यादा स्पष्ट केलेली नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. राज्य मागासवर्ग आयाेगाचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता भासल्यास मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बाेलावलं जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
त्यामुळे मराठा आरक्षण आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांना आरक्षणाबाबत सरकारने दिलेली 24 डिसेंबरही डेडलाईन हुकणार असल्याचं दिसत आहे.
त्यामुळे मराठा आंदाेलकांकडून 24 डिसेंबरनंतर आंदाेलन आणखी व्यापक करत राजधानी मुंबईत चक्काजाम केला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर मनाेज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सरकारने आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ, असा शब्द दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शब्दाला जागतील, असाआम्हाला विश्वास आहे. मात्र सरकारने शब्द न पाळल्यास आम्ही 23 डिसेंबरला आंदाेलनाची पुढील दिशा स्पष्ट करू. मात्र अद्याप मुंबईतील आंदाेलनाबाबत काेणताही निर्णय झालेला नाही, असं मनाेज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच सरकारने आश्वासनाची पूर्तता न केल्यास मराठे बघून घेतील, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. ते अधिकारी तात्काळ निलंबित करा.
सरकारकडून 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची घाेषणा न केली गेल्यास राज्यभरातून ट्रॅक्टर माेर्चा काढत मुंबईत
धडक दिली जाईल, अशी चर्चा साेशल मीडियावर रंगत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत मुंबई तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पाेलीस अलर्ट झाले आहेत. पाेलिसांनी राज्यभरात अनेक ट्रॅक्टर मालकांना 149 अंतर्गत नाेटीस पाठवल्याचे समजते.
याबाबतही मनाेज जरांगेंनी भाष्य केलं आहे. राज्यातील मराठा समाजाने अशा ट्रॅक्टर माेर्चाबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. असं असतानाही पाेलिसांकडून ट्रॅक्टरमालकांना अशा नाेटिसा का काढल्या जात आहेत? शेतीकामासाठी आता ट्रॅक्टर पण घ्यायचे नाहीत का? अशा नाेटिसा काढणायांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी मनाेज जरागेंनी केली आहे.
आणखी हे वाचा:
मराठा आणि कुणबी यांच्यात फरक काय असतो ? ९६ कुळी, सप्तकुळी, पंचकुळी मराठे नेमके कोण असतात ?