बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी मोठा चित्रपट घेऊन येत आहे. ईद 2025 च्या निमित्ताने प्रदर्शित होणारा ‘सिकंदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
टिझरला मिळाली जबरदस्त प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी ‘सिकंदर’ चित्रपटाचा 1 मिनिट 21 सेकंदांचा टिझर रिलीज करण्यात आला आणि अवघ्या काही वेळातच लाखो व्ह्यूज मिळाले. टिझर पाहून सलमान खान डॅशिंग लूकमध्ये जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले.
पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई होणार?
ट्रेड अॅनालिस्ट गिरीश वानखेडे यांच्या अंदाजानुसार, ‘सिकंदर’ प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल 60 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. जर हा आकडा खरा ठरला, तर चित्रपट पहिल्या आठवड्यातच 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता आहे.
महागड्या बजेटमधील सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट
‘सिकंदर’ हा सलमान खानच्या करिअरमधील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. चित्रपटात ऍक्शन, ड्रामा, रोमांस आणि सलमानची खास स्टाइल यांचा जबरदस्त मिलाफ असेल.
चित्रपटात कोणते कलाकार आहेत?
या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तसेच सत्यराज, श्रेयस तळपदे, प्रतीक बब्बर आणि शरमन जोशी यांसारखे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘सिकंदर’ कधी रिलीज होणार?
28 मार्च 2025 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटर्समध्ये धडकणार आहे. मोठ्या ऍक्शन सीन्स आणि दमदार स्टारकास्टमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलमानच्या आधीच्या चित्रपटांचेही रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.