“अररं तान्ह्या येडा का खुळा तू घरी लगीन काढलंय,
पै-पाहुण जमल्यात, घरांत सोहळ्याचं अन्न रांदतय,
दारात मांडव पडलाय, निवद दाखवलाय,
औतन पोचल्यात अन् तू मोहिमेवर गेलास तर,
जग हसलं राजांवर वरबापाला काय तर मोहिमेवर धाडलाय”
“वा आईसाहेब कोपऱ्यापातूर वगळ यैस्तोवर आम्ही भात आमटी वरपायची,
नवीन शेलं पागोटं घालून मिरवायचं नाचायचं अन् आमचं राजं कुठ तर
मोहिमवर आईसाब जग हसल आम्हास्नी. श्यान घालल तोंडात”
“तान्ह्या आदी रायबाचं लगीन पार पाड” “
“नाही राजं आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं”
-तानाजी मालुसरे