You are currently viewing पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ७००००  पगाराची नोकरी!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ७००००  पगाराची नोकरी!

तरूणांनो, ऐकलंत का?

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का?

तुम्हाला चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठित नोकरी हवी आहे का?

तर मग ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “सल्लागार” या पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना अधिकृतरीत्या जारी करण्यात आलेली आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ७०,००० रु पर्यंत पगार मिळणार असून त्यानुसार पात्र उमेदवारांना अधिकृतरीत्या दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ मार्च २०२४ आहे.

पदासंबंधी माहिती:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सल्लागार या पदासाठी ०१ जागा उपलब्ध आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला जंतुविज्ञान आणि उभयचर या विषयात एम.एससी. पदवीधर असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवाराला वन्यजीव क्षेत्रात रेपटाईल्स आणि ऍम्पीबिअन व एव्हेरी (Reptile and Amphibians, Aviary) मधील कामकाजाचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ७००००  पगाराची नोकरी!

उमेदवारांस शासकीय स्तरावर वन्य जीव सल्लागार विषयक कामकाजाचा अनुभव असणे त्याचप्रमाणे  वन्य जीव व सर्प क्षेत्रात Naturalist म्हणून कामकाज केल्याचा किमान १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरण्यात येणार नाही. एकूण निवड प्रक्रियेनंतर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ७०,००० /- रुपये पगार मिळेल असे अधिकृत संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.

नोकरीचे ठिकाण पुणे येथील  “पिंपरी-चिंचवड” असे असेल. सदर पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तसेच निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे राबवली जाईल. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ०४ मार्च २०२४ असेल. उमेदवारांनी अर्जासोबत अलीकडे काढलेले स्वतःचे दोन रंगीत फोटो जोडावे.

निवड झालेल्या उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार असून मुलाखतीची तारीख आणि वेळ ०५ मार्च २०२४ रोजी जाहिरात केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची स्वयंप्रमाणित प्रत जोडा. तसेच मुलाखतीसाठी येताना मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. लिफाफ्यावर “सल्लागार पदासाठी अर्ज” असे नमूद करावे.

अर्ज करताना घ्यायची काळजी:

अर्ज करताना उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांना संगणक आणि इंटरनेटचा वापर करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मुलाखतीत उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ७००००  पगाराची नोकरी!

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. कोणत्याही कारणास्तव वेळेवर अर्ज न केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांद्वारे प्रक्रियेचे वेळापत्रक पाळण्यात यावे.

अर्जासाठी पत्ता:

पदासाठी अर्ज पशुवैद्यकीय विभागाचे मा. आयुक्त यांच्या नावे करण्यात यावा. अर्ज पाठवण्याचा पत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी – १८ असा असेल.

तसेच मुलाखतीचे ठिकाण हे  मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरी मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – १८ असा असणार आहे .

तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही , सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

सल्लागार पदासाठीची अधिकृत जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याद्वारे प्रदर्शित करण्यात आली असून त्यासाठीचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे : www.pcmcindia.gov.in 

प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवार [020-6687 1111] या क्रमांकावर कॉल करू शकतात.

सदर प्रक्रियेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा…!

Leave a Reply