Pandhari Sheth Phadke, pandhari sheth phadke death : कोण होते गोल्डमॅन पंढरीशेठ फडके? | who is Pandhari Sheth Phadke news in marathi
गोल्डमॅन म्हणून ओळखले जाणारे पंढरी शेठ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पनवेलच्या विहिघर मध्ये पंढरी शेठ फडके यांचे निधन झाले.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचा बैलगाडा शर्यती ला प्रसिद्धी मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा आहे. पंढरी शेठ फडके हे महाराष्ट्रभर गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध होते. सोशल मीडियावर त्यांचे लाखोंच्यावर फॉलोवर सुद्धा होते.
पनवेल निवासी असलेले पंढरीनाथ फडके हे हातात गळ्यात किलोभर सोने घालून असायचे म्हणूनच त्यांना गोल्डमॅन अशी ओळख मिळाली होती.
बैलगाडा शर्यती मध्ये गाडीच्या टपावर आणि स्टेजवर डान्स करताना अनेकदा त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते.
पंढरी शेठ फडके यांना काही वर्षांपूर्वी अंबरनाथ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक सुद्धा झाली होती. बैलगाडा शर्यती वरून दोन गटात झालेल्या हाणामारीतून ही घटना समोर आली होती व या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्याकडे दावणीला 40 ते 50 शर्यतीचे बैल अजूनही बांधलेले आहेत.
पंढरीनाथ फडके हे पनवेल ठाणे रायगड अशा तीन जिल्ह्यात मोठे प्रसिद्ध होते.
अंबरनाथ मध्ये 2022 बैलगाडा शर्यत चालू असताना पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा माळक राहुल पाटील यांच्यामध्ये भांडण झाले होते आणि त्यामध्ये अंदाज दोन गोळीबारी करण्यात आला होता त्याप्रकरणी पंढरीनाथ फडके आणि एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न या गुन्हे अंतर्गत मोक्का लावण्यात आला होता.
पंढरीनाथ फडके हे चांगल्या बैलांवर नेहमीच नजर ठेवून असायचे शर्यत कोणतीही असो त्यामध्ये एक नंबरला बैल पळायला लागला की त्यावर पंढरी शेठ फडके याची नजर पडली समजा.
त्या बैलांवर नजर पडली की कितीही पैसे लागू द्या तो बैल पंढरी शेठ फडके विकत घेणारच ही ओळख होती.
पंढरी शेठ फडके आपल्या बैलांना महिनाभरात लाख-भार रुपयाची खाद घालत खाऊ घालत असे.
त्यामध्ये पिस्ता खोबरं काजू बदाम डाळ शेंगदाणे अशा गोष्टी असायच्या त्यामुळेच पंढरी शेठ फडके यांचे बैल तंदुरुस्त असायचे आणि पंढरी शेठ फडके बैलगाडा शर्यतीमध्ये नंबर एक असायचे.
शाळेच्या आवारातच गुरुजींचे कारनामे, तीन शिक्षिकांसह अश्लील कृत्य, बीडमधील घटनेने खळबळ
सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी Coaching Classes बंद केले, काय आहेत नवीन नियम?