वाढदिवसाआधीच मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना मोठे गिफ्ट, नेमकं काय घडलं?

वाढदिवसाआधीच मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना मोठे गिफ्ट, नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जवळ येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना मोठे गिफ्ट दिलं आहे. नेमकं काय घडलंय? चला जाणून घेऊ.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस आहे. राज्यभरातील शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. मात्र, शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच ठाण्यात पक्षाला खिंडार पाडलंय. ठाण्यातील युवासेनेच्या अनेक पदाधिऱ्यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाचं धनुष्यबाण हाती घेतलंय.

मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना मोठे गिफ्ट

शिंदे यांनी त्यांच्या नंदनवन निवासस्थानी ठाकरे गटाच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिलाय. या प्रवेशापूर्वी युवासेना पदाधिकारी यांनी आदित्य ठाकरे यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी सांगितलंय की, “गेल्या 15 वर्षांपासून युवासेनेच्या स्थापनेपासून युवकांचे संघटन ठाण्यात मजबूत करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने काम करत होतो. परंतु, गेल्या 2 वर्षात काही निवडक पदाधिकारी यांनी चालू केलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आमच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे आम्ही जड अंतकरणाने सामूहिकरित्या पदांचा राजीनामा देत आहोत.”

मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना मोठे गिफ्ट

ठाणे शहरातील उबाठा युवा सेनेचे शहर अधिकारी किरण जाधव, उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, बाळकूम शाखा प्रमुख अभिषेक शिंदे, शहर उपसमन्वयक दीपक कनोजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह अनेक युवासेना कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “गेल्या दोन वर्षात सरकारने कल्याणकारी योजना आणि विकासात्मक दृष्टीमुळे जनतेचा महायुती सरकारवर विश्वास वाढलाय. उबाठाच्या कार्यकाळात विकासाला लावलेले स्पीड ब्रेकर काढून राज्य प्रगतीच्या मार्गावर आणलंय.”

शिवसेनेत कार्यकर्त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक, यामुळे इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत ओघ सुरूच आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या शिकवणीच्या आधारावर राज्याचं नेतृत्व करत आहोत. गेल्या दोन वर्षात ग्रामीण तसेच शहरी विकासासाठी महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेच्या कल्याणासाठी सरकार यशस्वीरीत्या योजना राबवत असल्याने राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेत वाढत असल्याचेही त्यांनी सांगितलं.

2029 मध्ये एक देश एक निवडणूक? एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणूका


सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांना किती मानधन मिळते? भारतातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *