You are currently viewing सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? Social Media Marketing in Marathi

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? Social Media Marketing in Marathi

आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.आजकाल तर आठवी नववी च्या मुलां-मुलींपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सोशल मीडिया म्हणजेच Facebook, WhatsApp, Twitter, Instagram, Snapchat, LinkedIn, YouTube. इत्यादी चा वापर आपल्या मित्र मैत्रिणीशी Memes शेअर करण्यासाठी, फोटो टाकण्यासाठी, लाईक्स साठी, जॉब्ससाठी, कनेक्ट राहण्यासाठी… इत्यादी साठी केला जातो.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय
Memes For Social Sharing

आता तर फक्त एका क्लिक वर व्हिडिओ कॉल करून दुसरी व्यक्ती काय करतेय, कशी आहे हे पाहता येते. तर मग आता जसं लोकांना एकमेकांना अजून जवळ आणण्यासाठी सोशल मीडिया सारखं तंत्रज्ञान निर्माण झालं.

तसचं आता मार्केटिंग साठी सुद्धा म्हणजेच आपलं प्रोडक्ट,सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन तंत्र आले आहे ज्याचं नाव आहे सोशल मीडिया मार्केटिंग (SOCIAL MEDIA MARKETING) ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये SMM असेही म्हणतात.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? (SOCIAL MEDIA MARKETING)

सोशल मीडिया साईट्समधून आपल्या ब्रँड कडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याच्या कार्यपध्दतीला सोशल मीडिया मार्केटिंग असे म्हणतात.

या मध्ये लक्ष वेधून घेण्यायोग्य मजकूर म्हणजेच योग्य Tagline, Pitch Line, Blog, Images, Videos तयार करण्याचा प्रयत्न करून आपल्या ब्रँड ला प्रोडक्ट्सला, सेवेला जास्तीत जास्त प्रमोट करणे आणि तयार झालेला मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत / वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे हे केंद्रस्थानी असते.

एखादी घटना, वस्तू, सेवा, संस्था इ. विषयी मजकूर इंटरनेटच्या माध्यामातून उदा. वेबसाईट्स, सोशल मीडिया, बातम्या इ. व्दारे लाखेा ग्राहकांपर्यंत झटक्यात पोहोचू शकते.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय

२०२१ वर्षामध्ये तर जवळजवळ ८५% लोकं कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया अकाऊंट वर Active आहेत. आणि या कोरोना मुळे तर याची टक्केवारी अजून वाढली आहे. तर आपल्या प्रोडक्ट्स आणि सेवेची मार्केटिंग करण्यासाठी SMM हे अतिशय उत्तम साधन आहे.

सोशल मीडिया मुळे वेगवेगळ्या प्रकारची Audience आपल्याला कनेक्ट होतात.आणि आपलं ब्रँड, आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस देश विदेश पर्यंत पोहचवता येतात.

सोशल मीडिया मार्केटिंग (SOCIAL MEDIA MARKETING) चे फायदे

१) रिच (Reach)

तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफ़लाईन तुमच्या Target Audience सोबत Engage राहू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा मार्केटिंगचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

तुमचे ऑडियंस सोशल नेटवर्कवर जास्त वेळ असतात तर तुम्ही ज्या उत्पादनाचे मार्केटिंग करत आहात त्यासाठी युजर्सची आवड, स्वभाव आणि त्यांचे स्थान जाणून तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमचे उत्पादन किंवा सेवा पोहोचवू शकता.

२) जागरुकता (Awareness)

जर तुमचा व्यवसाय नवीन आहे किंवा तुम्ही नुकतेच नवे उत्पादन किंवा सेवा मार्केटमध्ये सादर केली असेल तर तुमच्या ब्रँडला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, ज्यामुळे लोकांना याबद्दल समजेल.

सोशल मीडिया यात तुमची मदत करू शकते, तुम्ही तुमचे उत्पादन किंवा सेवेच्या बाबतीत तुमच्या Target Audience मध्ये जागरूकता निर्माण करू शकता आणि त्यांच्या सोबत वेगवेगळ्या मार्गाने जोडलेले राहू शकता.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय

जर ब्रँड, सर्व्हिस आणि प्रोडक्ट्स जरी नवीन असेल तरी सोशल मीडियामूळे तुमचं प्रोडक्ट,तुमच्या ब्रँड विषयी ची जागरूकता कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत करू शकता.

३) ट्रॅफिक जनरेशन (Traffic Generation)

निरनिराळ्या प्रकारच्या चॅनल्सवरून तुम्ही ट्रॅफिक जनरेशन करू शकता ज्यात सर्च, डिस्प्ले, इमेल, SEO इत्यादी गोष्टी असू शकतात. लोकसुद्धा तुम्ही टाकलेले आणि त्यांना आवडलेले Content सोशल मीडिया साईट्सवर पसरूवून तुमचे ट्रॅफिक वाढवू शकतात. म्हणजेच भरपूर लोकांचे आपल्या Websites वर, ब्रँड कडे लक्ष वेधून घेऊ शकतो.

ट्रॅफिक जनरेशन (Traffic Generation)

आपल्या ब्रँड ला विविध सोशल मीडिया, ग्रूप्स मध्ये शेअर करून ट्रॅफिक मिळवू शकतो.तसेच आपण Paid Promotion करून ही आपल्या वेबसाइटवर जास्तीत जास्त ट्रॅफिक जनरेट करू शकतो.

४) एंगेजमेंट (Engagement)

सोशल मीडिया मार्केटिंगचा एक फायदा असा आहे की यामुळे तुम्ही तुमच्या यूजर्ससोबत जोडले जाऊन Engage राहू शकता. यामध्ये Like, Comments किंवा Share करणे या गोष्टींचा समावेश होतो.

एंगेजमेंट

जेव्हा तुमचे यूजर्स तुमच्या कंटेंटसोबत एंगेज राहतात तेव्हा ते ब्रँड अँडव्होकेटचे काम करतात आणि त्यासोबतच तुमचा ब्रँड प्रमोटसुद्धा करतात. सोशल मीडिया एक असे प्रभावशाली चॅनल आहे जे तुमच्या ब्रँड कंटेंटच्या भागाची शेअराबिलिटी वाढवते.

५) Brand Name (कंपनीचे / प्रोडक्ट्सचे नाव वाढेल)

सोशल मीडिया साईड्स वर स्वतःचा ब्रँड चे पेज ओपन करून त्यात वेगवेगळे आपल्या सर्व्हिस,प्रोडक्ट्स विषयी information टाकून आपण ब्रँड नेम वाढवू शकतो.

६) Lead Generation ( जास्तीत जास्त कस्टमर मिळवणे )

सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात लोकं Active असल्याने आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. हे असे माध्यम आहे की कमी वेळात आपण आपल्या प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसची लीड जनरेट करू शकतो.

जास्तीत जास्त कस्टमर मिळवणे

बरेच ब्रँडस सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी बजेट तयार करतात ज्याची रक्कम सोशल मीडियावर संवाद साधण्यासाठी खर्च केली जाते. तुम्ही मार्केटिंग कॅम्पेन सेट करून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन आदींवर लीड्स जनरेट करून विक्री करू शकता.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? सोशल मीडिया मार्केटिंग (SOCIAL MEDIA MARKETING)चे टिप्स

१) Target Audience बद्दल जाणून घेणे

सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये प्रथम आपण आपल्या Target Audience बद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. यामध्ये आपल्याला प्रेक्षकांना काय पाहिजे किंवा त्यांच्या आवडी निवडी विषयी जाणून घ्यायला हवे.

आपल्या प्रेक्षकांबद्दल जाणून घेतले तर आपण आपल्या प्रेक्षकांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या बद्दल जाणून घेणे गरजेचे असते.

Target Audience बद्दल जाणून घेणे

प्रेक्षकांना ज्या गोष्टीत जास्त रस आहे त्या विषयावर जास्त भर देऊन त्या विषयी सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट टाकणे. तसेच त्यांनी केलेल्या कंमेंट वर रिप्लाय देने आणि त्यांचा आपल्या बद्दलचा Feedback गोळा करणे, महत्वाचे असते. यामुळे आपण आपल्या Website वर Audience जोडून ठेऊ शकतो.

आपल्याला यशस्वीपणे सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धा चालवावी लागते.

२) Audience ना काय हवं आहे याचं संशोधन करणे (Audience Research)

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे म्हणून मोठया प्रमाणात स्पर्धा चालूच असतात. आपल्याला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या Audience च्या मताप्रमाणे किंवा त्यांना ज्या गोष्टीत रस आहे त्या विषयी प्रतिसाद दिला पाहिजे.

तसेच प्रेक्षकांना काही नवीन शिकायची अपेक्षा असते म्हणून आपण त्यांच्या विषयी संशोधन करून त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे तशाच प्रकारच्या पोस्ट अपलोड कराव्या.

३) आपल्या स्पर्धकांवर लक्ष ठेवणे (Competitor Analysis)

आपला स्पर्धक त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टीचे पालन करतो. तसेच त्याने व्यवसायासाठी वापरलेल्या काही योजनांवर आपण लक्ष ठेवले, तर आपण त्याने वापरलेल्या योजना पेक्षा आणखी चांगली योजना तयार करून अमलात आणू शकतो. अशा प्रकारे आपल्या स्पर्धकाविषयी संशोधन करनेही तितकेच महत्त्वाचे आहे.

४) सगळ्यात हटके Content

सोशल मीडिया कन्टेन्ट तयार करताना ते विचारपूर्वक तयार करायला हवे. आपले कन्टेन्ट हे इतरांनी तयार केलेल्या कन्टेन्ट पेक्षा वेगळे अगदी Unique असायला हवे तरच आपल्या प्रेक्षकांना आवडेल, आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. प्रेक्षकांसोबत संपर्क साधू शकतो.

५) नवनवीन रणनिती वापरा

आपण Facebook आणि Instagram या सोशल मीडियाचा वापर करून Live Video द्वारे आपल्या प्रेक्षकांसोबत थेट संपर्क साधू शकतो. सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण टाकलेली पोस्ट वारंवार ऑप्टिमाइझ करावी. म्हणजेच नवनवीन आणि Unique Content पोस्ट करायला हवे, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांचे रिटेन्शन वाढेल.

सोशल मीडिया विपणनासाठी उच्च गुणवत्तेची सामग्री प्रकाशित करणे आणि यशस्वी रणनिती तयार करण्यासाठी आपली सामग्री वेळोवेळी ऑप्टिमाइझ करणे महत्वाचे आहे.

सोशल मीडिया मार्केटिंग हे असे मध्यम आहे की जिथे वेगवेगळ्या प्रकारची Audience आपल्याला कनेक्ट होतात. आणि आपलं ब्रँड, आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस देश विदेश पर्यंत पोहचवता येते आणि लीड जनरेट करता येते.

आजच्या स्पर्धात्मक युगात आपले उत्पादन आणि सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “सोशल मिडीया एक सर्वोत्कृष्ट माध्यम आहे हे सर्वांनाच ठाउक आहे”.

सोशल मिडीया म्हणजे केवळ तरुणांसाठीचा टाईमपास नसून एक अत्यंत प्रभावशाली बिझनेस टूल आहे. एवढच नव्हे तर सोशल मिडीया मार्केटींग केवळ बलाढ्य कंपन्यांकरीता नसून स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योगांसाठीही तेवढाच किंबहूना जास्त उपयुक्त आहे.

सोशल मिडीया मार्केटींगचे तंत्र अवगत करुन प्रत्येकाला अत्यंत कमी “बजेट” मध्ये आपल्या व्यवसायासाठी ग्राहकांची एक न संपणारी पाईपलाईन तयार करता येईल.

Leave a Reply