You are currently viewing व्यवसाय वाढवण्यासाठी ७ सोशल मीडिया मार्केटिंग प्लॅटफॉर्म

व्यवसाय वाढवण्यासाठी ७ सोशल मीडिया मार्केटिंग प्लॅटफॉर्म

2021 या डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग चा वापर व्यवसाय वाढवण्यासाठी करणे खूपच गरजेचे झालेले आहे. दिवसेंदिवस सोशल मिडियाचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढत आहे यासाठीच तुम्हाला तुमचा व्यवसाय ऑनलाइन घेऊन जाणे व त्यापेक्षाही एक पाऊल पुढे म्हणजे सोशल मीडियावर त्याची ब्रँडिंग करणे खूप महत्त्वाचे आहे.

या ब्लॉग आर्टिकल मध्ये सात महत्त्वाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दिलेले आहे व त्याचा तुम्ही तुमचा व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी कशी वापरू शकता याची इत्थंभूत माहिती दिलेली आहे

७ सोशल मीडिया मार्केटिंग प्लॅटफॉर्म (Social Media Marketing Platform)

१) Facebook फेसबूक

७ सोशल मीडिया मार्केटिंग प्लॅटफॉर्म मध्ये पहिला प्लॅटफॉर्म आहे फेसबुक, जगातील 80% लोक फेसबूक वापरतायात. लहानपणीच्या आपल्या मैत्रिणीला मित्राला शोधायचं असेल तर फेसबूक हे एक उत्तम साधन आहे. FB वरून तर आपल्या Crush चे प्रोफाइल हि तुम्ही Stock करू शकता.

फक्त नावावरून आपण तिला/त्याला शोधू शकतो, बोलू शकतो, फेसबूक Voice Call वर बोलू शकतो, Memes शेअर करू शकतो, आपले फोटो, आपली आवड निवड, आपल्या आवडतीच्या ठिकाणी जाऊन फोटो काढून FB वर Post करू शकतो.

सोशल मीडिया मार्केटिंग प्लॅटफॉर्म

जवळवळ आपलं आयुष्यच लोकं Fb, Instagram, Snapchat, WhatsApp Status वर पोस्ट करतात.
आता जिथे लोकं आहेत, ग्राहक तिथे विक्रेता, व्यवसायक असलाच पाहिजे. म्हनूणच, आपला Business वाढवायला व्यवसायकाला आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याची FB हि एक उत्कृष्ट संधी आहे.

सोशल मीडिया मार्केटिंग प्लॅटफॉर्म

Facebook Ads चे Campaign चालवून, आपल्या व्यवसायाचे पेज चालवून, विविध पोस्ट टाकून, फोटो टाकून, ग्राहकांचे आपल्या Product सेवेबद्दल तृप्ततेच Review व्हिडिओे पोस्ट करू शकता. तसेच लिमिटेड टाइम ऑफर, फ्री शिपिंग डिस्काउंट, कूपन देऊन लोकांना आपल्या ब्रँडकडे आकर्षित करु शकता, जास्तीत जास्त विक्री करू शकता. ग्राहकांच्या प्रश्नांना Autoresponder द्वारे उत्तर दिले जाऊ शकते. आणि आपल्या ब्रँड चे ग्राहकांच्या मनावर राज्य करू शकता.

२) WhatsApp व्हाट्सएप्प

७ सोशल मीडिया मार्केटिंग प्लॅटफॉर्म मध्ये पहिला प्लॅटफॉर्म आहे व्हाट्सअँप, फेसबूकपेक्षा हि सर्वात जास्त वापरले जाणारे अँप म्हणजे व्हाट्सएप्प. ज्यात आजकाल Status ठेवणे, Video Call करणे, असे Trend चालू आहेत. तर मग विचार करा असं Platform जिथे FB पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. तिथे विक्रेत्याने जावे की नको?

सोशल मीडिया मार्केटिंग प्लॅटफॉर्म

व्हाट्सएप्पचा वापर ब्रँड जागरूकता वाढविण्यासाठी, YouTube, Blog चे क्लिक मिळविण्यासाठी आणि आपल्या Products आणि सेवांची माहिती, ऑफर ब्रॉडकास्ट मेसेजच्या माध्यमातून लोकापर्यंत, ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच विविध WhatsApp Groups मध्येही आपल्या ब्रँडची माहिती, ऑफर पोस्ट करु शकतो. तसेच Status Option जिथे २४ तास पोस्ट राहते.तिकडे तो ग्राहकांना विविध ऑफर्स, लिमिटेड टाइम ऑफर, फ्री कूपन्स, फ्री शिपिंग, सारख्या गोष्टींनी ग्राहकांना Product किंवा सेवा घ्यायला प्रोत्साहित करू शकता.

WhatsApp ने स्वतःचे New अँप आणले आहे ज्याचं नाव आहे WhatsApp Business.

WhatsApp Business विशेषत: छोट्या व्यवसायकाला लक्षात घेऊन तयार केले गेले होते आणि खास समाधान म्हणजे ते आपल्याला आपल्या ग्राहकांशी कनेक्ट राहण्यास मदत करते. व्यवसायासाठी WhatsApp Business चे ४ भारी आणि भन्नाट उपयोग आहेत:

1) Auto Responding Message

सामान्यपणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे टेम्पलेट म्हणून जतन करा आणि शॉर्टकट सेट करा.जेणेकरून, आपल्या ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे जलद मिळतील.

2) Labels

मेसेज चे आयोजन आणि वर्गीकरण करण्यासाठी लेबले वापरा. हे आपणास तातडीने संदेशांची क्रमवारी लावण्यास आणि परत आलेल्या ग्राहकांना ओळखण्यात मदत करते.

उदा., New Customer, Pending Payment, Paid, New Order, Ordered Complete….इत्यादी.

3) Catalog

Catalog जिथे आपण आपल्या प्रोडक्ट किंवा सेवेचे फोटो किंवा माहिती टाकू शकता. जेणेकरून तुमचं अकाउंट बघूनच ग्राहकाला तुमच्या प्रोडक्ट आणि सेवेच्या क्वॉलिटी, किंमत, वर्णन, सर्व माहिती मिळून जाईल.

Collogues किंवा Employees शी संपर्कात राहण्याचा देखील हा एक उपयुक्त मार्ग आहे. खरं तर, कामाच्या संवादासाठी 79% WhatsApp Business वापरतात. याचे वैशिष्ट्य हे की WhatsApp Groups मधून एकाच वेळी सुमारे 256 लोकांना संदेश पाठवू देते. WhatsApp Business वर पि.डी.एफ आणि इतर डाक्यूमेंट्स पाठविणे शक्य आहे. या सर्वांमधे, WhatsApp Business द्वारे आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी संवाद साधणे सोपे आणि परवडणारे आहे.

3) Twitter ट्विटर

सोशल मीडिया मार्केटिंग प्लॅटफॉर्म

कॉलेज मधल्या पिंटू पासून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान अश्या वेगवेगळ्या राष्ट्राच्या दिग्रज लोकं ट्विटर वापरतात. या माध्यमातून लोकं आपली मते मांडतात, प्रश्न विचारतात, न्यूज पोस्ट होतात. म्हणजे तेही एक प्रकारे एक भन्नाट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारची, वर्णाची, मतांची लोकं असतात.

मग विक्रेत्याने हेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडले नाही पाहिजे (कारण जर एखाद्या ग्राहकाला तुमचे प्रोडक्ट विषयी खंत असेल, तर तो लगेच ट्विट करून आपल्या ब्रँडची प्रत कमी करू शकते.) विक्रेत्याने जेवढे जमेल तेवढे ग्राहकांशी कनेक्ट राहिले पाहिजे.

आता ट्विटरद्वारे AD करण्यासाठी आपण वेगवेगळे Campaign करू शकतो जसे की,

अ) Promoted Accounts (जाहिरात केलेले अकाऊंट)-

आपल्या ब्रँड चे अकाउंट योग्य आणि आकर्षितरित्या वापरावे. जास्तीत जास्त फोल्लोवर्स (Followers) मुळे ब्रांडची प्रचिती होईल.

ब) Promote Tweets (प्रचारित ट्वीट)-

आपल्या Brand, Product, Service ची माहिती देऊन, ऑफर्स Tweet, Retweet करून Brand Name वाढवू शकतो.

क) Promoted Trend (जाहिरात केलेला ट्रेंड)-

नवीन ट्रेंडचा वापर करून आपलं ब्रँड प्रमोट करू शकतो आणि नवीन ट्रेंडही निर्माण करू शकतो. (So Be Unique And Trendy)

ड) Website Cards (वेबसाइट कार्डे)-

Website Cards द्वारें सुद्धा आपण आपलं Brand लोकांच्या मनात बिंबवू शकतो.

इ) Hashtag चा वापर (#) –

Hashtag चा वापर करून आपण आपलं ब्रांड नेम हे ट्रेंड लिस्ट मध्ये आणू शकतो.

उदा., #Addidas #Domino’s #Pizzahut…इत्यादी.

४) Instagram इंस्टाग्राम

फेसबुकपेक्षा 58% जास्त आणि ट्विटरपेक्षा 2000% जास्त असलेलं सोशल मीडिया अँप म्हणजे Instagram. इन्स्टाग्रामचा वापर 18-29 वयोगटातील मुलमुली आणि सर्व गटातल्या स्त्रिया यांच्यात थोडासा जास्त प्रमाणात आहे. इंस्टाग्राम वर सध्या Boomerang, फोटो Post करून लव्ह रिॲक्ट्स मिळवणे, Status Post करणे.

इंस्टाग्राम

जवळजवळ सगळे सेलेब्रिटीज़ हे Instagram वर आहेत. कारण त्यांचा Audience पण Instagram वरच जास्त प्रमाणात आहे. मग विक्रेत्याने, व्यासायकाने ही इथेही आपले पाऊल टाकले पाहिजे.

आपले Product च सेवेचं Instagram Page Open करून त्यात तुमच्या सेवा (Product) संबधीत विविध आकर्षक Videos टाकून, ग्राहकांना विविध ऑफर्स जसे Free Shipping, Discount Coupon.. इत्यादी देऊन जास्तीत जास्त विक्री करु शकता. आपले Brand Name वाढवू शकतो आणि व्यवसायाला प्रसिद्धी मिळवू शकतो.

इंस्टाग्रामवर Ads करून सुद्धा व्यवसायाची मार्केटिंग करणे खूप सोपे झाले आहे. इंस्टाग्राम वर Ads दोन प्रकारे करू शकतो. पहिले म्हणजे फेसबुक Ads च्या माध्यमातून आणि दुसरे डायरेक्ट इंस्टग्राम अँप वरून.

५) Snapchat स्नॅपचॅट

१८-३४ वर्षांच्या मुलांपैकी ४१% लोकं स्नॅपचाट चा वापर करत आहेत.त्यात सध्या filters चा खूप मोठा trend चालू आहे. Snapchat वर बरेच मार्केटिंगचे पर्याय आहेत.

स्नॅपचॅट
  • Snap Ads हे Mobile, Interactive Video Ads आहे.
  • Sponsored Lenses हे ज्यात Sponsored Brand स्वतःचे Customise Lenses बनवते, आणि ग्राहक त्याचा वापर Enjoyment, फोटो काढतो. आणि त्याच्यामुळे Indirectly त्या कंपनीची त्या Brand ची जाहिरात होते.
  • Snapchat Discover ads हे वेगवेगळ्या Brands ची Story ग्राहकांच्या, लोकांच्या Feeds च्या सर्वात वरती ठेवतात, जेणेकरून ग्राहकांचे त्याकडे लक्ष जावे आणि आपलं प्रोडक्ट, सेवा, Brand त्यांच्या लक्षात राहावी.
  • Sponsored Local Geofilters मध्ये वापरकर्ते त्यांच्या Stories मध्ये Brand’s ना Tag करु शकतात. जेणेकरून Brands ची जाहिरात होईल.

६) YouTube युट्युब

YouTube marketing आता brand बद्दल प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले आहे.

युट्युब

अ). Trailer व्हिडिओ

नवीन सदस्यांना Add करन्यासाठी, आपल्या स्वतःची आणि आपल्या व्यवसायाची ओळख असणे महत्वाचे आहे. Trailer व्हिडिओ आपल्याला तसे करण्याची मुभा देतो.सदस्यांना आपल्या ब्लॉगवर किंवा आपल्या वेबसाइटवर जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याची ही एक उत्तम संधी असते.

ब). Status व्हिडिओ

Status व्हिडिओ करण्याचा मोठा फायदा म्हणजे आपला व्यवसाय व्यवस्थित आणि विश्वासार्ह बनतो आणि ग्राहकालाही तो दिसतो. ग्राहकाच्या दृष्टीने, Market मधील Research करणे महत्वाचे आहे. मग आपण केलेले Research योग्य असेल तर ग्राहकाच्या दृष्टीने आपण सध्याच्या Trends शी जोडून आहोत, बाजारात काय चालले आहे ते आपल्याला माहिती आहे, ग्राहकासाठी काय चांगले आहे हे आपल्याला माहिती आहे. असं आपण ग्राहकांचा आपल्या विषयी आपल्या brand विषयी विश्वास संपादन करू शकतो.

क). Testimonials टेस्टिमोनिअल्स

जेव्हा आपला ग्राहक आपली उत्पादने/सेवा वापरत सतो. आणि तो आपल्या Product/सेवाशी Satisfied असेल. तर याबद्दलचा व्हिडिओ आपल्या कंपनीला चांगली प्रतिष्ठा देतो. आपण स्वतः त्यांचा व्हिडिओ (Testimonial) कॅप्चर करू शकतो किंवा ग्राहकांना त्यांच्या प्रोडक्ट Satisfaction Story ऑनलाइन पोस्ट करण्यासाठी Request करू शकतो. त्यानंतर आपण त्यांच्या व्हिडिओवरील Links आपल्या चॅनेला Connect करून त्यांना आवडीच्या विभागात जोडू शकतो.

ड). Q&A व्हिडिओ:

आपल्याकडे आधीपासून आपल्या वेबसाइटवर प्रश्नोत्तर असल्यास ती उत्तरे videoमध्ये रूपांतरित करा. आणि ती आपल्या YouTube चॅनेलवर अपलोड करा.आपण स्वत: Expert म्हणजेच त्या product/सेवेचे उच्च ज्ञान असल्याने उपयुक्त उत्तरे देता. क्षणार्धात लोकांना जेव्हा काही प्रश्न पडतात तेव्हा आपल्या व्हिडिओकडे जात असतात.

इ). ‘How To Do’ व्हिडिओ

बरेच लोक गोष्टी कशा करायच्या हे शिकण्यासाठी ऑनलाइन जातात. जर आपण चित्रांसह एखादा ‘How To Do’ असा Blog तयार केला असेल तर तो तयार करणे जेवढे सोपे पण संशोनात्मक काम आहे तसेच व्हिडिओदेखील आहे, जे आपल्याला समोरून Practically करुन दाखवतात. व्हिडिओ मध्ये Pause घेण्याची आणि Rewind करण्याची, Speed कमी करण्याची सुविधा आहे. त्यामुळे ग्राहकांना शिकण्याचे उत्तम साधन मिळते.

७) LinkedIn लिंक्डइन

जगातील ३० ते ६४ वयोमर्यादेतील जवळजवळ ६१% लोकं LinkedIn वापरतात. लिंक्डइन वर B2B Advertising आणि सोशल मीडिया मार्केटिंग Campaign साठी योग्य स्थान आहे. आपला ब्रँडचे विनामूल्य LinkedIn Page स्थापित करा.

लिंक्डइन

LinkedIn Page वर Product/सेवा Post करुन ब्रँडची जागरूकता वाढवा आणि ग्राहकांना आकर्षित करा. LinkedIn Ads सह आपल्या व्यवसायाला Promote करा. LinkedIn Campaign करून Sponsored Content, Sponsored Messages, Text Ads, Dynamic Ads याचा फायदा घ्या.

त्याबरोबरच Campaign Manager प्लॅटफॉर्मसह आपली जाहिरात Manage करा. Campaign Manager हा लिंक्डइन जाहिरात चा प्लॅटफॉर्म आहे जो आपल्याला Marketing साठी मदत करतो. ज्यात आपण आपले Campaigns एकाच ठिकाणी तयार करू शकतो, Measure आणि Optimize करु शकतो.

Leave a Reply