You are currently viewing वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा? How to Create WordPress Blog in Marathi

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा? How to Create WordPress Blog in Marathi


सध्याच्या या इंटरनेट युगात लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात FB, Insta, Snapchat, Twitter…. इत्यादी सोशल मीडिया उपलब्ध आहे. आणि त्या खालोखाल नंबर लागतो तो ब्लॉगिंगचा.

व्यक्त होण्यासाठी, क्रिएटिव्ह लिहिण्यासाठी, आपन जर एखाद्या गोष्टीत एक्स्पर्ट असाल तर ते ज्ञान जगासमोर लिखित स्वरूपात मांडायला ब्लॉगिंग हे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम आहे. पुढील आर्टिकल पूर्ण वाचा आणि शिका तुमचा वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा?

काही लोक ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तर काही छंद जोपासण्यासाठी ब्लॉगिंग कडे वळतायत. आता तर कोरोनाच्या कृपेने या लॉकडाउनच्या काळात ब्लॉगिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी WordPress, Blogger यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.

वर्डप्रेसवर नवनवीन, अत्याधुनिक हजारों फिचर्स उपलब्ध आहेत, त्यामुळे तुमचा ब्लॉग जास्त आकर्षित बनतो. WordPress.org वर सेल्फहोस्टेड ब्लॉग बनवण्यासाठी होस्टिंग आणि डोमेन खरेदी करावे लागते, त्यासाठी साधारणपणे एका वर्षाला ३,५०० रुपयांपासून खर्च येतो. पण जर तुम्हाला इतका खर्च करायचा नसेल तर तुम्ही Blogger.com वर फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकता.

ब्लॉगरवर का ब्लॉग का सेटअप करू नये ?

पण जर तुम्ही ब्लॉगिंग हे करिअर म्हणून निवडलंय तर माझ्या मते WordPress हे बेस्ट प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी. कारण वर्डप्रेसवर हजारो थीम्स, डिझायन्स, प्लगइन्स उपलब्ध आहेत ज्या ब्लॉगर वर खूप कमी प्रमाणात आहे.

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा?

महत्वाचं म्हणजे ब्लॉगर हे गूगलच सेटअप आहे, म्हणजे तुम्ही ब्लॉगर वर तुमचा ब्लॉग जरी बनवला तरी त्याचा मालक, म्हणजे मालकी हक्क गूगलभाऊला असेल. आणि तुम्ही गूगल विरोधात काहीही मत मांडले आणि ते गूगलला पटले नाही, तर तुमचा ब्लॉगच काय अख्खी वेबसाईट अख्खं ब्लॉगिंगच अकाऊंट उडवतील.”

एकंदरीत सांगायचा मुद्दा हा की,ब्लॉगर मध्ये गूगलला मालकी हक्क असतो, तर वर्डप्रेस वेबसाइट वर फक्त आणि फक्त तुमचा मालकी हक्क असतो.

वर्डप्रेस चे दोन प्रकार आहेत WordPress.org आणि WordPress.com

जगातील एक तृतीयांश वेबसाइट्स वर्डप्रेस वापरतात. वर्डप्रेस हे एक सॉफ्टवेअर आहे.ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे ब्लॉग, वेबसाईट किंवा ई-कॉमर्स स्टोअर देखील तयार करू शकता. वर्डप्रेस वर ब्लॉग बनवण्यासाठी कोडींग किंवा वेब डिझायनिंग चे ज्ञान असणे गरजेचे नाही.

WordPress.com वरून मोफत ब्लॉग बनवता येतो. (फक्त sign up करा आणि सुरू व्हा लिहायला)
पुढील लिंक ने तुम्ही तुमचे वर्डप्रेस अकाउंट बनवू शकता.

WordPress.com चे फायदे आणि तोटे

WordPress.com मध्ये खूप मर्यादा आहेत. खूप कमी प्लगइन्स, खूप कमी थीम्स. म्हणजे जर तुम्हाला करिअर म्हणून ब्लॉगिंग करायची असेल तर WordPress.com वर खूप कमी पर्याय आहेत, तुमचा ब्लॉग आकर्षित आणि प्रोफेशनल दिसण्यासाठी.

प्लगइन्स खूप कमी प्रमाणात आहेत ज्यामुळे तुम्ही मनासारखे फिचर्स तुमच्या ब्लॉगवर समावेश करू शकणार नाही. मोनेटायजेशन म्हणजेच पैसे मिळवण्यासाठी जर तुम्ही WordPress.com वर अँफिलिएट लिंक टाकली किंवा गूगल अँडसेन्स टाकलं, तर तुम्हाला काही टक्के कमिशन WordPress.com ला द्यावे लागतील.

WordPress.com चे फायदे आणि तोटे

सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही WordPress.com वर फ्री अकाऊंट खोलून आपले ब्लॉग टाकले, तर प्रसिध्दी तर मिळेल (अर्थात कंटेंट भारी असला तर) पण मोनेटायजेशन म्हणजेच त्या फ्री अकाऊंट आणि Personal अकाऊंट मधून तुम्ही पैसे कमवू शकणार नाही.

तुमचा ब्लॉग मोनेटायज करण्यासाठी तुम्हाला WordPress.com चा Premium, Business किंवा E-Commerce प्लॅन घ्यावा लागेल (माफक दर आहे), मग तुम्ही जाहिरात, अँफिलिएट लावून पैसे कमवू शकता. WordPress.com वर फक्त एक क्लिक करून बॅकअप करू शकता.

WordPress.com वर तुम्हाला वर्डप्रेसच्या सर्व टर्म्स आणि कंडिशन्स चे अनुसरण करावे लागेल, जर तुम्ही पालन नाही केले तर ते तुमची एवढी मेहनतीने चालवलेली वेबसाइट एका क्षनार्धत हटवू शकतात.Wordpress.com ची सुरक्षितता स्वतः वर्डप्रेस करते. याचा अर्थ तुमचे ब्लॉगिंग अकाऊंट सुरक्षित लॉकर मध्ये आहे.

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा?

WordPress.org वरून ब्लॉग बनवण्यासाठी डोमेन Domain व होस्टिंग Hosting विकत घ्यावे लागते. सर्वात आधी आपण डोमेन आणि होस्टिंग काय असत ते समजून घेऊ.

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा? हे पूर्ण वाचण्यापूर्वी, या पोस्ट पहा:

डोमेन Domain म्हणजे काय?

डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईटचा अँड्रेस, ज्याचा वापर करून लोकं तुमच्या वेबसाईट वर जाऊ शकतात. आणि तुम्हीही विवीध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लोकांना तुमच्या ब्लॉगचा वेब अँड्रेस पाठवून ब्लॉगवर ट्रॅफिक वाढवू शकता.

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा?

उदा., Google.com, Facebook.com, YouTube.in, KalyanJwellers.com

होस्टिंग Hosting म्हणजे काय?

होस्टिंग म्हणजे तुमच्या वेबसाईट मधील डेटा, कंटेंट, फाईल्स विशिष्ट काळासाठी होस्टिंग कंपनीच्या सर्व्हर मध्ये साठवली जाते. जेव्हा कधीही कोणता व्यक्ती तुमच डोमेन नेम वेबसाइट टाईप करतो, तेव्हा तुमच्या वेबसाईट वरील कंटेंट त्या व्यक्तीला पोहचवण्याची सर्व जबाबदारी या होस्टिंग देणाऱ्या कंपनीची असते.

म्हणजे एकंदरीतच, डोमेन म्हणजे घरचा पत्ता आणि होस्टिंग म्हणजे स्वतः घर, जिथे सर्व काही सामान, बेड, किचन, टॉयलेट असते.(I hope हे उदाहरण तुम्हाला कळले असेल.)

होस्टिंग Hosting म्हणजे काय?

डोमेन व होस्टिंग विकत घेणे सोप्पे आहे. तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग चा वापर करून होस्टिंग विकत घेऊ शकता. डोमेन व होस्टिंग कसे विकत घ्यायचे?

मार्केट मध्ये अनेक होस्टिंग आणि डोमेन सुविधा देणाऱ्या कंपन्या आहेत. उदा., Hostinger, BigRock, BlueHost, GoDaddy इत्यादी. मी तुम्हाला Hostinger वरून डोमेन व होस्टिंग विकत घेऊन वर्डप्रेस कसे इंस्टॉल करायचे ते दाखवणार आहे.

होस्टींगर Hostinger वरून होस्टिंग कशी विकत घ्यावी?

सर्वात अगोदर गूगल वर Hostinger.com असे सर्च करा. त्यानंतर Hostinger ची वेबसाईट ओपन करा.

तिथे दिलेल्या होस्टिंग टॅबवर क्लिक करा. त्यानंतर Shared Web Hosting वर क्लिक करा. आता तुमच्या गरजेनुसार हवा असणारा परवडणारा प्लॅन चेक करा. व तो सिलेक्ट करा.

होस्टींगर Hostinger वरून होस्टिंग कशी विकत घ्यावी?

Add to cart वर क्लिक करा. Hostinger कंपनी त्यांच्या एक वर्षाच्या होस्टिंग प्लॅन सोबत एक फ्री डोमेन सुद्धा देते. सर्वात अगोदर डोमेन नेम निवडून घ्या.

(तिथे domain check availability वर क्लिक करून तुमचं आवडत डोमेन नेम उपलब्ध आहे का बघा आणि योग्य ते डोमेन नेम निवडा)

होस्टींगर Hostinger वरून होस्टिंग कशी विकत घ्यावी?

आता तुमच्या गूगल अकाउंट ने लॉग इन करून घ्या आणि त्यानंतर Checkout वर क्लिक करून payment करून घ्या. पेमेंट झाल्यावर डोमेन व होस्टिंग तुमच्या डॅशबोर्डमध्ये समाविष्ट होईल.

अश्याप्रकरे तुम्ही ५ मिनिटात Hostinger वरून होस्टिंग विकत घेऊ शकता.

होस्टिंग विकत घेतल्यानंतर त्यावर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?

तुम्ही विकत घेतलेल होस्टिंग आणि डोमेन येईल. तिथे दिलेल्या Manage बटन वर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर Hostinger चे स्वतःचे Panel ओपन होईल. त्यात Auto installer वर क्लिक करा. त्यानंतर एक पेज ओपन होईल त्यात तुमचे नाव, ई-मेल आयडी, युजरनेम, पासवर्ड इत्यादी माहिती टाकून वर्डप्रेस इंस्टॉल करा.

ब्लॉगसाठी Theme Install करणे.

आता जसं आपल्या मोबाईल मध्ये जश्या हव्या तश्या वेगवेगळ्या कलर च्या, वेगवेगळ्या डिझायनच्या, थीम्स वापरू शकतो. तसचं वर्डप्रेस वर ही थीम्स वापरून आपला ब्लॉग आकर्षित करू शकतो. आणि लोकांना आपल्या ब्लॉग वर पुन्हा पुन्हा येण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. जेव्हा तुम्ही वर्डप्रेस इंस्टॉल करता. आणि तुमचे अकाऊंट लॉगिन केले.

तेथे Admin ऑप्शन मध्ये dashboard येते. डॅशबोर्ड वरून, आपण वर्डप्रेस थीम मधून शेकडो फ्री थीममधून आपल्या साइटसाठी योग्य, तुम्हाला आवडणारी थीम निवडू शकता, त्यासाठी तुम्हाला Appearance -> Themes -> Add New वर क्लिक करायचे आहे .

होस्टिंग विकत घेतल्यानंतर त्यावर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे?

त्या नंतर तुम्ही तिथे सर्च करून तुम्ही तुम्हाला हवी ती थीम इंस्टॉल करू शकता. किंवा काही डिझायनर थीम खरेदीही करू शकता.

वर्डप्रेस ADMIN dashboard मध्ये दोन ऑप्शन आहेतः Page आणि Post.

Page म्हणजे आपल्या वेबसाईटचा पृष्ठ भाग, जिथे आपण आपली माहिती (Intro), संपर्क (Contact Us), About Us (म्हणजे आपण काय करतो वैगरे, आपल्या व्यवसाय विषयीची माहिती), वेगवेगळया सोशल मीडिया लिंक्स टाकू शकतो.

ब्लॉग पोस्ट कशी पब्लिश करायची ?

Post म्हणजे तुमचं कंटेंट लिहून एडिट करून तुम्ही पब्लिश करता. ब्लॉग पोस्ट लिहीण्यासाठी तुम्हाला Posts -> Add New वर क्लिक करायचे आहे.

ब्लॉग पोस्ट कशी पब्लिश करायची?

तिथल्या वर्डप्रेस Blog Editor मध्ये तुम्ही सहज तुमची पहिली पोस्ट लिहायला सुरवात करू शकता. एकदा का तुमची पोस्ट लिहून झाली तर वरती उजव्या साइड ला Publish बटन वर क्लिक करून तुम्ही ती पोस्ट पब्लिश करू शकता.

वर्डप्रेस Blog Editor मध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे ऑप्शन सुद्धा दिसून येतील जसे की Categories, Tags, Featured Images इत्यादि. सुद्धा तुम्ही तुमच्या पोस्ट मध्ये टाकू शकता. आणि तुमची पोस्ट अजून आकर्षित बनवू शकता.

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा

किंवा नंतर पब्लिश करण्यासाठी Save draft वर क्लिक करून सेव्ह करून ठेवू शकता.

तुम्ही ठरवलेल्या तारखेला पोस्ट पब्लिश करण्यासाठी Scheduling Post ऑप्शन देखील समाविष्ट आहेत.

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा

कोणतीही पब्लिश झालेली पोस्ट जेव्हा तुमच्या मनाला वाटेल तेव्हा पूर्णपणे Delete करू शकता.

वर्डप्रेस प्लगइन कशी इंस्टाल करावी?

वर्डप्रेस Plugins म्हणजे तुम्ही एक प्रकारे अँप्लिकेशन म्हणू शकता .ह्याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या फिचर्स चा आस्वाद घेऊ शकता,ते ही कोणत्या ही प्रकारची कोडिंग न करता. WordPress.org मध्ये ५०,००० हून जास्त प्लगइन्स उपलब्ध आहेत.

प्लगइन इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला Plugins -> Add New क्लिक करायचे आहे.

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा

आपल्या वर्डप्रेससह येणाऱ्या शेकडो विनामूल्य प्लगइनमधून निवडू शकता किंवा काही डिझाइन केलेले प्लगइन्स खरेदी आणि इंस्टॉल करू शकता.

आपणास ट्रॅफिक सहज वाढविण्यात मदत करणारी सर्वात लोकप्रिय प्लगइन म्हणजे Yost SEO जी आपणास गूगल सारख्या सर्च इंजिन मध्ये जास्तीत जास्त ट्रॅफिक निश्चित करण्यात मदत करते.

WordPress.org चे फायदे आणि तोटे:

wordpress.org हे अमर्यादित माध्यम आहे. त्यात शेकडो,हजारो थीम्स आणि प्लगइन्स आधीच उपलब्ध असतात. जेणेकरून तुमचा ब्लॉग अजून आकर्षित आणि प्रोफेशनल दिसेल.

प्लगइन्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमच्या मनासारखे फिचर्स तुमच्या ब्लॉग वर समावेश करू शकता. आणि तुमच्या वेबसाईट चे वैशिष्ट्य वाढवू शकता.

Pros

  • युझर फ्रेंडली सी.एम.स.
  • प्लगइन्स
  • एसईओ फ्रेंडली
  • रिस्पोन्सिव्ह वेबसाइट्स
  • ओपन सोर्स कम्युनिटी

Cons

  • कस्टमायझेशन
  • असुरक्षितता आणि डेटा सुरक्षा
  • वारंवार अपडेट

मोनेटायजेशन म्हणजेच पैसे मिळवण्यासाठी जर तुम्ही WordPress.org वर कितीही अँफिलिएट लिंक्स टाकू शकता आणि गूगल अँडसेन्स टाकू शकता, इथे तुम्हाला कोणाचीही रोक टोक नसणार आणि कोणालाच कसले कमिशन द्यावे लागत नाही आणि कितीही कमवू शकता.

WordPress.org हे सेल्फहोस्टेड वेबसाईट असल्या कारणाने तुमच्या कंटेंटचे बॅकअप तुमच्या होस्टिंग देणाऱ्या कंपनीच्या प्लॅन प्रमाणे असेल.

WordPress.org वर तुम्हाला WordPress.com सारखे कोणतेच टर्म्स आणि कंडिशन्स नसते. WordPress.org वर टाकलेले कंटेंट च्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमच्या होस्टिंग देणाऱ्या कंपनीची असते. आणि चांगल्या प्रकारे ते सुरक्षीत ही करतात.

आता इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बेस्ट कोणतं WordPress.com की WordPress.org

बघा जर तुम्हाला फक्त छंद जोपासायचा आहे, तर wordpress.com तुमच्यासाठी बेस्ट आहे.

पण तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये करिअर करायचं आहे तर भविष्यासाठी WordPress.org हे 99.99% बेस्ट आहे. कारण यात सुरुवातीला होस्टिंग साठी पैसे जरी खर्च करावे लागत असले तरी तुम्हाला हजारों थीम्स, प्लगइन्स, वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता मिळते.

कितीही जाहिरात, अँफिलिएट लावू शकता, कितीही कमवू शकता आणि नो रोक टोक. (भाई बिझनेस करना है तो थोडा इन्वेस्ट भी करना पडेगा ना ब्रो)

आता 90% मित्र मैत्रिणींना पडलेला प्रश्न- WordPress.com वरून WordPress.org करता येईल का ?
होय, भावांनो आणि बहिणींनो असं करता येईल. आणि असं करता येते. काही सेटिंग्ज करावे लागतील आणि प्लॅन्स घ्यावे लागतील इतकंच.

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा बनवायचा? याच उत्तर तुम्हाला मिळालेच असेल, तरी सुद्धा काही शंका असेल किंवा प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा.

Leave a Reply